मुंबई : ड्रग्सच्या मुद्यावरून बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या या ड्रग्सच्या मुद्याचा आवाज आता संसदेतही घुमला आहे. यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता घराघरात 'शक्तिमान' म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेता मुकेश खन्ना यांनी जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आणि भाजप खासदार रवि किशन यांनी संसदेत बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन यावर आवाज उठवला. रवि किशन यांच्या वक्तव्यानंतर बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 


जया बच्चन यांनी म्हटलं की, 'काही लोकांमुळे रवि किशन संपूर्ण सिनेसृष्टीला बदनाम करू शकत नाहीत'. जया बच्चन पुढे म्हणाल्या की,'ज्या ताटात खातात तिथेच छेद करतात.' रवि किशन आणि जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 



मुकेश खन्ना म्हणाले की,' या सिनेसृष्टीत सर्वांना काम करण्याचा अधिकार आहे. सिनेसृष्टी अनेक वर्षांपासून चालत आहे. ही कुणाची जहागीर नाही.' रवि किशन म्हणतात की, 'इंडस्ट्रीत ड्रग्स चालत नाही. कुणी म्हणतं की, ज्या ताटात खाता त्यामध्येच छेद करता. हे खूपच चुकीचं विधान आहे.'


 दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी अनेक खुलासे समोर येत आहे. दरम्यान मंगळवारी राज्यसभेत शून्य प्रहारमध्ये ड्रग्स मुद्द्यावर जया बच्चन भाष्य केले. ड्रग्ज मुद्द्यावरुन वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात अशा आशयाचं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं. त्यानंतर अनेक कलाकारांना त्यांना पाठिंबा देखील दिला. परंतु काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ट्रोल केलं आहे.