Radhika Merchant Arangetram:  अंबानी कुटुंबानं नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. अगदी आकाश आणि श्लोकापासून खुद्द मुकेश आणि नीता अंबानी या दोघांनीही या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. बरं इतकंच नव्हे, अनिल अंबानी यांचीची उपस्थिती इथं पाहायला मिळाली. बॉलिवूडपासून क्रिडा जगतापर्यंत बऱ्याच गाजलेल्या व्यक्तींचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. (mukesh nita ambani attends to be daughter in law Radhika Merchant Arangetram Ceremony)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा कार्यक्रमत अंबांनीच्या घरचाच होता असं म्हणायला हरकत नाही. कारण, हा कार्यक्रम होता त्यांच्या होणाऱ्या सुनेचा, राधिका मर्चंट हिचा. भरतनाट्यम (Bharatnatyam) या कलाप्रकारातील एक अद्वितीय सादरीकरण राधिकानं सर्वांचीच मनं जिंकली. 


नृत्य प्रशिक्षण पूर्ण होण्यानिमित्त राधिकानं 'अरंगेत्रम' (Arangetram) सादर केलं. आपल्या होणाऱ्या सुनेला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून म्हणजेच अनंत अंबानी याच्या होणाऱ्या पत्नीच्या केला दुजोरा देण्यासाठी अंबानी कुटुंबानं खास हजेरी लावली. 


मर्चंट आणि अंबानी कुटुंबानं यावेळी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत केलं. कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनीच राधिकाचं नृत्यकौशल्य पाहत तिला उत्फूर्त दादही दिली. 


काय आहे अरंगेत्रम? 
अरंगेत्रम सादर करण्याचा क्षण राधिका आणि तिच्या गुरू भावना ठाकर यांच्यासाठी अत्यंत मोलाचा होता. मागील 8 वर्षांपासून त्यांनी राधिकाला या दिवसासाठी तयार केलं होतं. अरंगेत्रम, हा तोच क्षण असतो जेव्हा कोणीही शास्त्रीय नृत्य नर्तक किंवा नर्तिका पहिल्यांदाच व्यासपीठावर नृत्य सादर करतात. 




वर्षानुवर्षे घेतलेली त्यांची मेहनत पहिल्यांदाच जगासमोर येते. अरंगेत्रम, हे शास्त्रीय नृत्य रंगमंचावर सादर करण्याचं आणि दुसऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्नातक असण्याचं प्रतीक असतं. 


योगायोगानं खुद्द नीता अंबानीसुद्धा भरतनाट्यम शिकल्या आहेत. त्यामुळं आता राधिकाच्या रुपानं अंबानी कुटुंबात आणखी एका भरतनाट्यम नर्तिकेचा प्रवेश होणार असं म्हणायला हरकत नाही.