मुंबई : लोखंडवाला परिसरात एका मॉडेलचा अतिशय विचित्र अवस्थेत सापडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गुरूवारी सकाळी या मॉडेलचा मृतदेह लोखंडवाला येथील फ्लॅटमध्ये सापडला. या मॉडेलचं नाव सुनीता सिंह असून ती 49 वर्षांची होती. अशी शंका वर्तवली जात आहे की, सुनीताचं डोकं वॉश बेसिनला लागल्यामुळे जमिनीवर कोसळली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुनीता आपल्या घरात होती. त्यावेळी तिच्यासोबत 22 वर्षांचा मुलगा लक्ष्य सिंह आणि 21 वर्षांची त्याची गर्लफ्रेंड आयशा प्रिया होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी भरपूर दारू प्यायले होते. तिचं डोकं बेसिनला आपटलं आणि ती खाली पडली. आणि हीच घटना घडल्याचं मुलाने देखील सांगितलं. 


मुलीने दिलेल्या माहितीनुसार, सुनीताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. आता पोलीस पुढील तपास करत असून मुलगा लक्ष्य आणि त्याची गर्लफ्रेंड आयशाकडे चौकशी करत आहेत. तसेच या घटनेचा कसून तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता सिंह 2 वर्षांपूर्वीपर्यंत मॉडेलिंगची काम करत होती.