गिरीश कर्नाड यांना `टाटा लाईफ टाईम अचिव्हमेंट` अवॉर्डने गौरविण्यात येणार
ज्येष्ठ अभिनेते आणि नाटककार गिरीश कर्नाड यांना टाटा लिटरेचर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार २०१७ ने गौरविण्यात येणार आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि नाटककार गिरीश कर्नाड यांना टाटा लिटरेचर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार २०१७ ने गौरविण्यात येणार आहे.
७९ वर्षीय कर्नाडांना साहित्योत्सवच्या वार्षीक पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान देऊन गौरविण्यात येईल. हा सोहळा १९ नोव्हेंबरला नरीमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे पार पडणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी ऐकून फार आनंद झाला अशी प्रतिक्रीया कर्नाड यांनी व्यक्त केली आहे.
कर्नाड यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की, थिएटरच्या माध्यमातून मानवी संबंधांची गुंतागूंत सोडवणे ही एक कठीण गोष्ट आहे. आणि हा गुंता सोडवत असताना जर कोणी म्हणाले तुम्ही चांगले काम केले आहे. यात तुम्ही यशस्वी झालात तर, तो अनुभव अत्यंत सुंदर असतो. टाटा लिटरेचर लाईव्हने नाटककार म्हणून माझा सन्मान करणे ही माझ्यासाठी मोठी पावती आहे, असेही कर्नाड यांनी म्हटले आहे.
गिरीश कर्नाड यांनी दिगदर्शित केलेले व गाजलेले चित्रपट
उत्सव (हिंदी भाषेत), उंबरठा (मराठी), ओंदनोंदू कालादल्ली (कानडी), कनक पुरंदर (कानडी), काडू (कानडी), कानुरू हेग्गदिती (कानडी), गोधुलि (हिंदी), तब्बलियू नीनादे मगने (कानडी), निशांत (मराठी)
वंशवृक्ष (कानडी),
कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
अग्नी मत्तू मळे (कानडी भाषेत), टिपू सुलतान (मराठी भाषेत), तलेदंड (कानडी), तुघलक (मराठी), नागमंडल (मराठी), ययाती (मराठी), हयवदन (मराठी),
कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार (२०१२), नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२), पद्मभूषण (१९९२), पद्मश्री (१९७४), भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल (१९८९), पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद (१९७४-७५), ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२), ’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०), संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार (१९७२), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४), होमी भाभा फेलोशिप (१९७०-७२), ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)