Abhishek Bachchan: हिंदी कलाजगतामध्ये फारशी प्रसिद्धी मिळाली नसली तरीही या क्षेत्रात निर्माता आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावत यश मिळवणाऱ्या अभिषेक बच्चन यानं अनेकांनाच थक्क केलं आहे. कारण, अभिषेकनं मुंबईतील एका मोक्याच्या आणि तितक्याच उच्चभ्रू भागामध्ये एकदोन नव्हे, तर तब्बल 6 आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. सदर व्यवहाहाशी संबंधित कागदपत्रांचा हवाला देत Zapkey नं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. 


कुठ खरेदी केले हे फ्लॅट? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेकनं मुंबईच्या बोरिवली इथं असणाऱ्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पामध्ये हे अपार्टमेंट खरेदी केले आहेत. एकूण 4,894 चौरस फुटांच्या या अपार्टमेंटसाठी अभिषेकनं प्रति चौरस फूट 31,498 रुपये इतकी रक्कम मोजली आहे. प्राथमिक माहितीनुसार विक्री करार 5 मे 2024 मध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे. (Mumbai Real Estate)


कागदोपत्री माहितीनुसार 1101 चौरस फूट इतकं चटई क्षेत्र असणाऱ्या या एका अपार्टमेंटची किंमत 3.42 कोटी रुपये सांगण्यात येत असून, उर्वरित दोन अपार्टमेंट 252 चौरस फूट इतके आहेत. त्यांची किंमत 79 लाख रुपये सांगितली जात आहे. चार आणि पाच क्रमांकाचे अपार्टमेंट अनुक्रमे 1101 आणि 1094 चौरस फुटांचे असून, त्यांची किंमत 3.52 आणि 3.39 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. तर, सहावं अपार्टमेंट 9.39 कोटी रुपयांचं असल्याची माहिती समोर आली आहे. 


हेसुद्धा वाचा : अरे व्वा! ऐन पावसाळ्यात शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास; पुणे- मुंबई अंतर गाठा 'इतक्या' वेळात... 


बोरिवली पूर्व भागात किमान एक एकरांच्या भूखंडावर असणाऱ्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पामध्ये एकूण 8 लक्झरी रेसिडेंशिअल टॉवर असून, इथंच 15 लाख चौरस फूट परिसरात एक मॉलही असल्याचं सांगितलं जात आहे. अभिषेकनं या संपूर्ण व्यवहारासाठी एकूण 15 कोटी रुपये मोजल्याचं सांगितलं जात आहे. 


मुंबईत रिअल इस्टेट व्यवसायाला वेग...  


एनारॉकच्या एका अहवालानुसार मुंबई एमएमआर आणि दिल्ली एनसीआर इथं महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या बांधकामांसाठी गडगंज पैसे मोजले जाण्याचं सत्र सध्या वेगानं सुरु आहे. या भागांमधील घरांचे दर सध्या साधारण 13 ते 27 टक्क्यांनी वाढले आहेत. इतकंच नव्हे, तर मागील तीन वर्षांमध्ये मुंबईतील लोअर परेल, मलबार हिल, बोरिवली यांसारख्या भागांमध्ये आलिशान, लक्झरी घरांची खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली असून, कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत.