Raj Kundra Case : पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात आणखीन एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय... मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात हे पुरवणी आरोपपत्र सादर केलं. याप्रकरणी राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. त्यामुळे या प्रकरणी पुढे कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणाजे आता राज कुंद्रासह अभिनेत्री आणि मॉडेल्स शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra), पूनम पांडे (Poonam Pandey) आणि चित्रपट निर्माती मीता झुनझुनवाला (Meeta Jhunjhunwala) यांच्या विरोधात देखील आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. राज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये अश्लील व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यांनी व्हिडीओ विविध OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्याचं आरोपपत्रात दाखल करण्यात आलं आहे. 


पोलिसांनी शुक्रवारी राज कुंद्रा आणि कर्मचारी उमेश कामत, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे, कॅमेरामन राजू दुबे (cameraman Raju Dubey), झुनझुनवाला आणि  Banana Prime ओटीटीचे संचालक सुवाजित चौधरी (Banana prime OTT director) यांच्याविरुद्ध 450 पानांचे आरोपपत्र सादर केले.


नक्की काय आहे प्रकरण?  


अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा Pornography प्रकरणी चर्चेत आला आहे.  गेल्या वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्राने काही मॉडेल्स आणि स्ट्रगलिंग अभिनेत्रींना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावल्याचा आरोप केल्यानंतर राज कुंद्रावर आहे. (raj kundra current affairs)


गेल्यावर्षी पॉर्न सिनेमे बनवत इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला. या आरोपांनंतर कित्येक दिवस राज कुंद्रा तुरुंगात देखील होता. पण आता पुन्हा आरोपपत्र दाखल केल्यामुळे राज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.