नवी दिल्ली : बॉलिवूडमधील अनेक कलाकार रस्त्यांवर स्टंट करताना दिसतात. पण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता वरूण धवन तर चक्क भररस्त्यात असंच काहीस अॅडवेंचर करताना दिसला. आणि महत्वाची बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी या संदर्भात वरूण धवनच्या घरी ई-चलन पाठवले आहे. चलन मिळताच वरूण धवनने अगदी चांगल्या 'स्टुडंट' प्रमाणे माफी मागितली आहे. हा सर्व प्रकार घडला आहे एका फॅनमुळे. 


काय आहे हा नेमका प्रकार? 


आपल्याला माहितच आहे मुंबईतील रस्ते हे कायम गजबजलेले असतात. गाड्यांची वरदळ हा मुंबईचा अविभाज्य भाग आहे. याच मुंबईतील भररस्त्यात वरूण धवन आपल्या फॅनसोबत सेल्फी काढताना दिसला. ऑटो रिक्षात असलेले फॅन वरूण धवनला पाहून खूप उत्साहीत झाली. आणि तिला वरूणसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. तेव्हा वरूणने त्या फॅनचा सेल्फी हातात घेऊन आपल्या गाडीतून तिच्यासोबत सेल्फी काढला. आणि खास बाब म्हणजे हा फोटो एका वर्तमानपत्रात प्रकाशित देखील झाला. 



मुंबई पोलिसांनी या फोटोसह ट्विट करत वरूण धवनला फटकारलं आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडले वरूणला टॅग करून ट्विट केलं आहे की, वरूण धवन या प्रकारचा अॅडवेंचर तुम्ही सिल्वर स्क्रिनवर करा. मात्र मुंबईच्या रस्त्यांवर नको. 
तू या प्रकाराने स्वतःचा आणि तुझ्या फॅनचा जीव धोक्यात घातला आहे. आम्ही तुझ्यासारख्या जबाबदार नागरिकाकडून आणि यूथ आयकॉनकडून अशी अपेक्षा करत नाही. एक ई- चलन तुझ्या घरी येतच असेल. यापुढे असा प्रकार आढळल्यास कडक कारवाई होईल. 



यानंतर वरूण धवनने या प्रकारावर ट्विट करून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे सांगितले. तसेच त्याने सांगितले की, हा प्रकार सिग्नलवर घडला आणि तेव्हा रेड सिग्नल होता. त्याचप्रमाणे एक कलाकार म्हणून मी फॅनचं मन दुखवू शकत नाही असे देखील सांगितले. आणि यापुढे मी पूर्ण काळजी घेईल अशी ग्वाही देखील दिली आहे.