मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत सिनेमा हीट झाला की त्याचे सिक्वेल बनवण्याची प्रथा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदीतील हाच ट्रेंड आता मराठी सिनेसृष्टीतदेखिल आला आहे. 


स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीला सुपरहीटला करणारा मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचा तिसरा भागही लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात त्यांची भेट आणि मुंबई - पुण्याची स्वभाव वैशिष्ट्य यामध्ये खुलणारी प्रेमाकथा दाखवण्यात आली होती. दुसर्‍या भागामध्ये लग्नाची तयारी आणि शेवटच्या क्षणापर्यंत नववधूची होणारी घालमेल दाखवण्यात आली होता. आता तिसर्‍या भागात या चित्रपटाची कथा कोणतं वळण घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 



 


काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशीने मुंबई पुणे मुंबईचा तिसरा भाग येणार याचे संकेत दिले होते. मात्र आता या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबई पुणे मुंबईच्या तिसअर्‍या भागाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. तसेच हा चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहितीदेखील दिली आहे. 


मुंबई पुणे मुंबई 3  या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडेच करणार आहेत. तर संजय छाब्रिया हेच निर्माते राहणार आहेत. सोबत अमित भानुशाली असोशिएट  प्रोड्युसर आहेत.