धक्कादायक : लग्नानंतर कतरिना कैफचं अफेअर समोर
अभिनेत्याने नुकताच कतरिना कैफच्या लव्हस्टोरीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : कंगना रानौतच्या 'लॉकअप' या शोमधील स्पर्धक मुनव्वर फारुकीने अलीकडेच शोमध्ये त्याच्या आणि कतरिना कैफच्या लव्हस्टोरीबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुनव्वर फारुकीने सांगितलं की, तो कतरिना कैफच्या प्रेमात कसा पडला होता आणि यानंतर त्याचं हार्टब्रेक करुन ती कशी निघून गेली. मुनव्वरचं हे सगळं बोलणं गंमतीत आणि आपल्या सहकारी स्पर्धकाला अजमा फल्लाहला त्रास देण्यासाठी असलं तरी काही वेळासाठी मात्र मुनव्वर याबाबत खूप गंभीर असल्याचं प्रेक्षकांना वाटलं होतं.
मुनव्वर फारुकीची लवस्टोरी
एप्रिल फूलच्या आधीच मुनव्वर फारुकी प्रेक्षकांना एप्रिल फूल बनवण्यात यशस्वी ठरला आहे. काही काळ सगळ्यांचं लक्ष त्याच्या बोलण्यावर खिळलं होतं. अजमाने मुनव्वरला विचारलं, 'तुला ती आवडते हे तिला माहीत आहे का?' तर या मुनव्वर म्हणाला की, नाही तिला माहित नाही. यावर अजमाला धक्काच बसतो आणि ती म्हणते की, फक्त तुला माहित आहे की, तु तिला लाईक करतोस? तर यावर मुनव्वर म्हणाला 'मी यावर कन्फर्म आहे की मी तिला लाईक करतो, मात्र तिने माझं हार्टब्रेक करुन लग्न केलं.'
मुनव्वर फारुकीने केला प्रँक
अजमा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, जर तिचं लग्न झालं तरी ती तूला का आवडते? यावर मुनव्वर म्हणाला की, का? ती आवडू शकत नाही का? पण माझं हार्टब्रेक झालं. मुनव्वरच्या मस्करीबद्दल पूर्णपणे नकळत अजमाने भावूक होत म्हटलं तुझी तेव्हा काय हालत झाली असेल? यानंतरही मुनव्वर आपली मस्करी सुरूच ठेवतो आणि म्हणातो मीडिया बरोबरच सगळीकडे एकच बोललं जात होतं फोन उचलला तरी सगळीकडे तिच्याशीच संबंधित बातम्या येत होत्या.
युजर्सनादेखील खरं वाटू लागलं
जेव्हा हा प्रँन्क शिगेला पोहोचला तेव्हा मुनव्वर फारुकीने प्रेमाने अजमाला विचारलं की, तू कतरिना कैफला ओळखतेस का? यावर अजमा हसू लागते आणि म्हणते मस्करी करू नकोस, त्रास देऊ नकोस. मुनव्वर फारुकीने या विनोदाने केवळ अजमालाच नाही तर प्रेक्षकांनाही त्रास दिला आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये स्माईल इमोजी शेअर केले आहेत.