मुंबई : पती आपल्या पत्नीसाठीचे लाड पुरवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. पण पाकिस्तानच्या अभिनेत्याने तर कॉर्नर सीट वैगरे सोडा, पत्नीसाठी अख्खं थिएटरचं बुक केलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अभिनेत्याने कोणता सिनेमा पाहाण्यासाठी पूर्ण थिएटर बुक केला असेल. तर तो सिनेमा दुसरा तिसरा कोणता नसून अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा पाहाण्यासाठी पूर्ण थिएटर बुक केला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गंगूबाई काठियावाडी' पाहायाचा आहे म्हणून पत्नीसाठी संपूर्ण थिएटर बुक करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्याचं नाव आहे, मुनीब बट्ट.... मुनीब आणि त्याची पत्नी आयमान खान कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात.


सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. आता देखील पत्नीसाठी पूर्ण थिएटर बुक केल्यामुळे मुनीब बट्ट चर्चेत आला आहे. मुनीब आणि आयमान चाहत्यांना कायम कपल्स गोल्स देत असतात.