मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी 'मुन्ना मायकल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये टायगर मायकल जॅकसनला श्रद्धांजली देणार आहे. ट्रेलरची सुरुवात मायकलपासूनच होते.


सिनेमाचं दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केलं आहे. सिनेमामध्ये टायगर, मायकल जॅकसनचा एका मोठ्या फॅनची भूमिका करणार आहे. ज्याचं लहानपण मुंबईच्या रस्त्यांवर गेलं. या सिनेमातून टायगरसोबत निधी अग्रवाल डेब्यू करत आहे. हा सिनेमा २१ जुलैला रिलीज होणार आहे. नवाजुद्दीन सिद्धीकी देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे.