Mushtaq Khan on on unequal pay : बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान हे हिंदी चित्रपटातील लक्षात ठेवणाऱ्या भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यातील एक भूमिका म्हणजे अक्षय कुमारच्या 'वेलकम' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी. या चित्रपटात त्यांनी बल्विश डे उर्फ बल्लूची भूमिका साकारली होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुश्ताक यांनी या चित्रपटासाठी त्यांना मिळालेल्या मानधनावर वक्तव्य केलं आहे. या वेळी ते म्हणाले की अक्षय कुमारच्या स्टाफला देखील त्यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळालं असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या मानधनावरून अनेकदा चर्चा होत असल्याचे आपण पाहतो. त्यात सगळ्यात मोठा वाद हा अभिनेत्रीला अभिनेत्यापेक्षा कमी मानधन मिळणं आहे. दोघांचे तितकेच महत्त्वाचे काम असले तरी त्यांना अभिनेत्याला मिळतं तितकं मानधन मिळत नाही. आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे आणि त्याचं कारण मुश्ताक खान यांची मुलाखत आहे. मुश्ताक खान यांनी डिजिटल कमेंटरी पॉडकास्टमध्ये बोलताना वेलकममधील त्यांच्या मानधनाविषयी वक्तव्य केलं आहे. 


याविषयी बोलताना मुश्ताक खान म्हणाले की 'मला चित्रपटासाठी मिळालेलं मानधन हे अक्षय कुमारच्या स्टाफ पेक्षा कमी असू शकतं. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपली चित्रपटसृष्टी ही स्टार्सवर खूप पैसे खर्च करते. आम्ही सगळीकडे एकटे जातो, आम्ही इकोनॉमीनं प्रवास करतो आणि निर्मात्यांनी ठरवलेल्या हॉटेलमध्ये राहतो. दुबईत मला ज्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी सांगितले होते, जिथे अक्षय कुमारचं स्टाफ राहत होतं. मोठ्या चित्रपटांमध्ये असं अनेकदा होतं.'


मुश्ताक खान यांनी पुढे सांगितलं की 'मात्र, अनेक निर्माते आहेत, ज्यांना या भेदभावला संपवायचं आहेय मी 'स्त्री 2' हा चित्रपट करतोय आणि मला त्यांच्याकडून खूप प्रेम मिळतंय. ते सगळ्यांची काळजी घेतात. आम्ही एकत्र खूप मज्जा केली. याशिवाय मी 'रेल्वे मॅन' ही सीरिज केली आणि मला खूप मज्जा आली. प्रोडक्शनच्या टीमनं खूप आदर दिला. प्रोडक्शनमध्ये असलेले नव्या पिढीतील लोकं आणि इतकंच नाही तर ते अभिनेता म्हणून ते खूप चांगल काम करत आहेत.'  


हेही वाचा : लक्षद्वीपला प्रमोट करताना रणवीर सिंगनं शेअर केला मालदीवचा फोटो! चूक लक्षात येताच डिलीट केली पोस्ट


मुश्ताक खान यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारली आहे. त्यात 'रावडी राठोड', 'गोपी किशन', 'वॉन्टेड', 'एक और एक ग्यारह', 'मुझसे शादी करोगी' आणि 'गदर 2' हे चित्रपट आहेत. याशिवाय त्यांनी छोट्या पडद्यावरल काम केलं आहे. त्यात 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'द जी हॉरर शो' आणि 'अदालत' असे काही शो आहेत.