अजय - अतुल करणार `पानिपत` चं संगीत
सैराटच्या संगीतदिग्दर्शनानंतर देशा-परदेशात ज्यांच्या गाण्याचं कौतुक झालं ते अजय अतुल आता कोणता चित्रपट घेऊन येणार?
मुंबई : सैराटच्या संगीतदिग्दर्शनानंतर देशा-परदेशात ज्यांच्या गाण्याचं कौतुक झालं ते अजय अतुल आता कोणता चित्रपट घेऊन येणार? याबाबत त्यांच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. मात्र पुन्हा एकदा बड्या बॉलिवूड चित्रपटाचा भाग होण्याचा सन्मान अजय-अतुलला मिळाला आहे.
तरण आदर्शने केली घोषणा -
सिनेनिर्माते, दिग्दर्शक अविनाश गोवारीकर यांच्या आगामी 'पानिपत' या चित्रपटाचं स्कोर म्युझिक सांभाळण्याची जबाबदारी अजय अतुल यांच्यावर आली आहे. यापूर्वी धर्मा प्रोडक्शन निर्मित सैराटच्या हिंदी रिमेकची गाणीदेखील अजय अतुल करणार आहेत.
तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजय अतुल 'पानिपत'ची गाणी करणार असल्याची माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अविनाश गोवारीकरांसोबतचा अजय अतुलचा फोटो शेअर केला आहे.
कोण झळकणार 'पानिपत'मध्ये
पानिपत या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन आणि संजय दत्त झळकणार आहे. अविनाश गोवारीकर दिग्दर्शित हा सिनेमा 6 डिसेंबर 2019 ला रीलिज होणार आहे.यापूर्वी अजय अतुल यांंनी सिंंघम,पीके,अग्नीपथ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. तर जोधा अकबर, लगान यासारखे उल्लेखनीय हिंदी सिनेमे त्यांंनी केले आहेत. मागील वर्षी 'व्हेंंटिलेटर' या मराठी सिनेमामध्येही त्यांंनी खास भूमिका साकारली होती.