नवी दिल्ली : केरळचे प्रसिद्ध संगीतकार आणि पियानोवादक बालाभास्कर यांचं मंगळवारी पहाटे निधनं झालंय. गेल्या आठवड्यात त्यांच्या कारला पल्लीपुरममध्ये अपघात झाला होता. या अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले होते तर त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला होता. हॉस्पीटलनं दिलेल्या माहितीनुसार, बालाभास्कर यांचा सोमवारी रात्री १२.५५ वाजता निधन झालंय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालाभास्कर यांच्या निधनामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसलाय. त्यांचं पार्थिव शरीर तिरुअनंतपुरम महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. आज त्यांच्यावर तिरुअनंतपुरममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. 



गेल्या आठवड्यात वायोलिनवादक बालाभास्कर आणि त्यांची पत्नी त्रिशूरहून आपल्या घरी परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यांची कार पल्लीपुरम भागात एका झाडाला धडकली होती. बालाभास्कर यांची मुलगी तेजस्वीनी हिला एका खाजगी हॉस्पीटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं. वाहनचालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.