तृप्ती गायकवाड,झी मीडिया, मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. कधी मिम्समधून तर कधी बिंधास्त शैलीमुळे प्राजक्ता बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच तिने शेअर केलेल्या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलंय. फादर्स डेच्या निमित्ताने प्राजक्ताने पहिल्यांदाच तिच्या वडिलांबद्दल मोठा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्ताने वडिलांच्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिचे वडिल आणि संपूर्ण कुटुंब गाणी गाताना आणि नाचताना दिसत आहे. फादर्स डेच्या निमित्ताने तिने हा व्हिडीओ शेअर केला. प्राजक्ता म्हणते की, माझे बाबा मागच्या वर्षी खूप आजारी होते.त्यांना नीट चालता ही येत नव्हतं. तरीही ते चेहऱ्यावर हसू आणत "मैं हूं डॉन"..!हे गाणं मोठ्याने गात होते. 


 



पुढे ती असंही म्हणते की, कोणत्याही कठीण परिस्थितीत आनंदी रहाण्यासाठी तुमच्याकडे लहान मुलांसारखं निरागस मन असावं लागतं.मी खूप नशिबवान आहे की, मला जगातले सगळ्यात गोड बाबा मिळाले. मी मुंबईत राहून 10 वर्षांचा काळ लोटला. आपली मुलगी एकटी मुंबईत राहते म्हणून ते न चुकता मला दिवसातून दोनदा कॉल करतात. आणि त्यांचा कॉल कट करण्याची मला परवानगी नाही. ज्यांच्या पाठीशी बाबा खंबीरपणे उभे असतात, मार्गदर्शन करतात ते सगळेच या जगात सर्वात श्रीमंत आहेत. देवाला थेट आपल्याला मदत करता येत नाही, म्हणून तो आपल्यासाठी आई बाबांना पाठवतो. या जगातल्या सगळ्या बाबांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा... 


प्राजक्ताने फादर्स डेच्या निमित्ताने तिच्या बाबांविषयीचं प्रेम व्यक्त केलं. तिच्या या पोस्ट चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. प्राजक्ता आणि तिचं संपूर्ण कुंटुंब या व्हिडीओत आनंदाने नाचताना, गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ काही तासातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मुलांच रक्षण करणारा बाप हा डॉनचं असतो,असं एका युजरने कमेंट केली.