मुंबई : मालिकांमधून लोकप्रियता मिळवल्यावर मोठ्या पडद्यावरून लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोहचलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत सध्या त्याच्या ब्रेकअप आणि नव्या अफेअरमुळे चांगलाच चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिता लोखंडेसोबत त्याचं ब्रेकअप झाल्यावर चांगलीच चर्चा रंगली. मात्र हे ब्रेकअप का झालं ? याचं उत्तर तेव्हा मिळालं नव्हतं. आता ते मिळालं आहे. 


अंकिता आणि सुशांतसिंग यांच्यात असं काय झालं की, त्यांनी ब्रेकअप केलं ? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. मात्र यावर त्यावेळी दोघांनीही काहीही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. आता स्वत: सुशांतसिंग राजपूतने यावरून पडदा उठवला आहे. ‘मी बोअरिंग असल्यामुळे माझ्या पहिल्या गर्लफ्रेण्डने मला सोडलं’, असं म्हणत सुशांतने सांगितलं आहे. हे सांगत असताना त्याने कुठेही अंकिता लोखंडेच्या नावाचा उल्लेख नाही. 


‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुशांतसिंग राजपूतने हा खुलासा केलाय. आपल्यावर बसलेला ‘प्लेयर’चा शिक्का पुसण्याचा प्रयत्न असल्याचं तो म्हणाला. मी खूपच बोअरिंग असल्यामुळे माझ्या पहिल्या गर्लफ्रेण्डने मला सोडलं. तेव्हापासून मी ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, असं सुशांत म्हणाला. 


सुशांत सिंग राजपूत ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होता. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. सुशांतची पहिली गर्लफ्रेण्ड अंकिताच होती. आता सुशांतसिंगचं नाव अभिनेत्री क्रिती सेनन सोबत जोडलं जात आहे.