मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज कोण ओळखतं नाही. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज जरी प्राजक्ता मराठीतील टॉपची अभिनेत्री असली तरिही तिली खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'जुळून येती रेशीम गाठी'. या मालिकेतून प्राजक्ता घरा-घरात पोहचली आणि यानंतर तिनेही कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज प्राजक्ताचा सोशल मीडियावर मिलीयनच्या घरात चाहता वर्ग आहे. आज प्राजक्ता केवळ अभिनेत्रीच नाही तर एक बिझनेस वुमनदेखील आहे. या गोंडस अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात  तिने तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहलं की, आज ''जुळून येती रेशीमगाठी''ला सुरू होऊन १० वर्ष झाली. त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. कृतज्ञता  आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम. आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत.आदित्य-मेघना महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयूष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. #बाबाजीलक्षअसूद्या.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खरंतर प्राजक्ताची ही पोस्ट तिची मालिका जुळून येती रेशीम गाठी या मालिकेच्या संदर्भातील आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहते तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने लिहीलंय, कमाल होती सीरिज... झी मराठी चे सोनेरी दिवस... तर अजून एकाने लिहीलंय, मराठी मालिकांचा सुवर्णकाळ आणि त्याततलीच एक एक अप्रतिम कौटुंबिक मालिका आणि आदित्य &मेघना जोडी तर अजून एकाने लिहीलंय, मला शीर्षकगीत अजूनही आठवते ,जुन्या आठवणी पुन्हा एकदा डोळासामोर आल्या. तर अजून एकाने लिहीलंय, मराठी मालिकेतील सुंदर आणि अप्रतिम जोडी आणि तुम्हा दोघांना पुन्हा मराठी मालिकेत पाहण्याची आशा आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते प्राजक्ताच्या पोस्टवर करत आहेत.