Naach Ga Ghuma : ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतीसाद मिळत आहे. गेल्या पाच दिवसांत चित्रपटानं कलेक्शनच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित केला असून शनिवारी आणि रविवारी चित्रपटाचे जवळजवळ सर्वच शो हाउसफुल होते. चित्रपटातील कलाकार विविध चित्रपटगृहांमध्ये जावून रसिकांशी संवाद साधत असून रसिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका चित्रपटगृहात समारंभादरम्यान कलाकार म्हणाले की, “आता इथे बसलेल्या सगळ्या राण्या आहेत, कोणी आपल्या आशाताईला घेवू आलंय का?” मग एक जोडी एकत्र पुढे आली. त्यांचा सत्कार झाला. “चित्रपटातील प्रत्येक गोष्ट वस्तुस्थितीला धरून आहे. मला कधीही वेळेवर जायला जमत नाही. नेहमी उशीर होतो, मग ओरडा पडतो. पण आमचं नातं अगदी घट्ट आहे. बाई मला कधी मदतनीससारखं वागवत नाहीत. आमचं नातं तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच आहे. या चित्रपटात आमचं नातं हुबेहूब उतरले आहे”, असं त्यावेळी मदतनीस असलेल्या महिलेनं सांगितलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नम्रता संभेराव या दोघींचं कौतुक करते. तुमच्यातील जो बंध आहे, तोच आम्ही चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या एका चित्रपटगृहात स्वप्नील जोशी उपस्थित महिलांपैकी काहींना पुढे व्यासपीठावर बोलवतात आणि त्यांच्या प्रातिनिधिक सत्कार करतात. यावेळी महिला भरभरून या चित्रपटाबद्दल बोलतात. चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल 3.5 कोटींचं कलेक्शन केलं असून मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक विक्रम आहे. त्याशिवाय चित्रपटानं सर्वाधिक आगाऊ आरक्षणाचा विक्रमही नोंदविला असून दैनंदिन शोंचा विचार करता सर्वधिक शो विकले जाण्याचा विक्रमही चित्रपटाच्या नावावर नोंदविला गेला आहे.


हेही वाचा : करीनाच्या 'या' गोष्टीला वैतागला तैमूर; स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा


मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी यांनी चित्रपटाचं लेखन केलं असून त्यांच्यासह शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.