आली लहर केला कहर, मौनी रॉय बिकिनी घालून आली कॅमेरासमोर
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते
मुंबई : टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी मौनीची चर्चा जरा वेगळ्या कारणामुळे होत आहे. सध्या मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने स्वत: हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत ज्यात ती बिकिनी, शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स शूज घालताना दिसत आहे. मौनी रॉयच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
व्हायरल झाले फोटो
चाहत्यांनी मौनी रॉयच्या किलर लूकचं कौतुक केलं आहे. मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवंनवीन शेअर करत राहते. अलीकडेच तिने तिचे काही बोल्ड ड्रेसमधील फोटो शेअर केले जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अशी झाली सुरुवात
मौनी रॉयच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचं झालं तर 18 लाखांहून अधिक लोक केवळ इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला फॉलो करतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मौनी रॉय टीव्ही इंडस्ट्रीच्या माध्यमातून बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिने 2006मध्ये 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही शोद्वारे छोट्या पडद्यावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
यानंतर तिने देवों के देव ... महादेव, जुनून, जरा नच के दिखा, पति पतनी और वो आणि नागिन सारख्या मालिकांमध्ये काम केलं. टीव्ही शो नागिनद्वारे तिने बरीच लोकप्रियता मिळवली. याशिवाय मौनी रॉयने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मौनी गोल्ड, रन, केजीएफ आणि मेड इन चाइना सारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली आहे.