`नाळ 2` `या` तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला, चैत्या उलगडणार आठवणींचा खजिना
Naal 2 Release Date: पाच वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या `नाळ` या चित्रपटाचा सिक्वेल आता नव्यानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहीर झाली आहे. त्यामुळे आता येत्या दिवाळीत तुम्हाला एका चांगल्या चित्रपटाची पर्वणी पाहायला मिळणार आहे.
Naal 2 : 2018 मध्ये नाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसादही लाभला होता. काही दिवसांतच या चित्रपटानं फार मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिसवर न भूतो न भविष्यति असं कलेक्शन केले होते. कारण तेव्हा आलेल्या बॉलिवूड चित्रपटांनाही या चित्रपटानं पार मागे टाकले होते. आता या चित्रपटाला मिळालेला उंदड प्रतिसाद पाहता या चित्रपटाचा अखेर पुढील भाग येतो आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. येत्या 10 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकतीच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली असून आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.
तेव्हा तुमचा काही प्लॅन असेल तर तुम्ही तो नक्कीच बाजूला ठेवू शकता आणि 'नाळ 2' पाहण्यासाठी सज्ज राहा. या चित्रपटातील चैत्याच्या आयुष्यात नक्की काय घडणार तो आपल्या खऱ्या आईला भेटणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की चैत्याला आपली खरी आई कोण हे समजते परंतु त्या दोघांची नीट भेटही होऊ शकत नाही. त्यातून चैत्या म्हणजे बालकलाकार श्रीनिवास पोकळे याच्या निरागस अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले होते. त्यामुळे त्याचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्याचाही एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यातून आता या चित्रपटातून श्रीनिवास परत या भुमिकेतून दिसणार का मग तो मोठा झालेला दिसेल का की त्याच्या ऐवजी कोणी दुसरा कलाकार असेल याचाही जोरात चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून आता या चित्रपटातील पहिलं वहिलं गाणंही प्रदर्शित झालं आहे. त्यावरून कदाचित अंदाज हा लावला जाऊ शकतो. त्यातून आता प्रेक्षकांची वाटही संपली आहे कारण या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा : VIDEO : सूहाना खाननंतर आर्यन खाननं गरीबांना केली पैशांची मदत...
श्रीनिवास पोकळे, ओम भूतकर, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार अशा हरहुन्नरी कलाकारांनी या चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यामुळे आता या नव्या भागातूनही आपल्याला नाळ या चित्रपटातून आपल्या अजून अनेक गोष्टींचीही उकल होणार आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. पहिल्या भागातील आठवणींचा खजिना चैत्या हा पुन्हा एकदा उलगडणार आहे. तेव्हा येत्या दिवाळीत आपल्याला या नव्या चित्रपटाची पर्वणी पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचा दुसरा टीझर आला आहे. ज्यात श्रीनिवास पोकळे म्हणजे चैत्या आपल्या आईसोबत दिसतो आहे. त्यावरून आपली वरील शंका दूर होते. तेव्हा आता उरते फक्त उत्सुकता... तुम्ही टीझर 2 मधून पाहिलात का?