झी टॉकीज तर्फे नाचू कीर्तनाचे रंगी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली !
Nachu Keertanache Rangi: झी टॉकीज वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनोरंजनाची आवड जपली जाते. संतसाहित्य, संतवाणी, अभंग याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे.
Zee Talkies Quiz competition: नव्या वर्षात मनोरंजनाच्या पर्वणीची अनेक दालने खुली होत असताना झी टॉकीज या वाहिनीने प्रेक्षकांना अनोखं बक्षीस मिळवून देणारी संधी आणली आहे. झी टॉकीज या वाहिनीवरून सादर होणाऱ्या गजर कीर्तनाचा व मन मंदिरा या दोन्ही कार्यक्रमातून संतवाणी ऐकताना प्रेक्षक तल्लीन होत असतात. आता या प्रेक्षकांना कधीही आणि कुठेही कीर्तन ऐकवणारी विठ्ठल-रखुमाईची अनोखी आकर्षक मूर्ती मिळवण्याची संधी मिळणार आहे. 'नाचू कीर्तनाचे रंगी' ही प्रश्नमंजुषा १ जानेवारी २०२३ पासून पुन्हा सुरू होत असून या स्पर्धेचे यंदा तिसरे पर्व आहे. रोज नित्यनेमाने झी टॉकीज वाहिनीवर ३१ मार्च २०२३ पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे.
झी टॉकीज वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनोरंजनाची आवड जपली जाते. संतसाहित्य, संतवाणी, अभंग याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. मनोरंजनातून प्रबोधन या संकल्पनेवर गेल्या कित्येक पिढ्या कीर्तन, प्रवचन करणारे कीर्तनकार हा वारसा जपत आहेत. आजच्या काळातही कीर्तनातून समाजाला वैचारीक बैठक देण्यासाठी झी टॉकीज या वाहिनीवर गजर कीर्तनाचा व मन मंदिरा हे कार्यक्रम सादर केले जातात. या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळत आहे. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीच्यावतीने नाचू कीर्तनाचे रंगी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू केली होती. नव्या वर्षात या स्पर्धेचे तिसरे पर्व खुले होणार असल्याचे जाहीर होताच प्रेक्षकांनाही आनंद झाला आहे.
झी टॉकीज तर्फे यापूर्वीही नाचू कीर्तनाचे रंगी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती . या स्पर्धेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता . या स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांमध्ये प्रेक्षकांनी अचूक उत्तर देत बक्षीसांची लयलूट केली होती .ही स्पर्धा पुन्हा सुरू करावी यासाठी प्रेक्षक ईमेल व फोन द्वारे आग्रही मागणी करत होते . या मागणीची दखल घेत झी टॉकीजने पुन्हा एकदा ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी सुरु केली आहे .
ही स्पर्धा ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत कीर्तन ऐकणाऱ्या प्रेक्षकांसाठी रोज सकाळी साडे सात वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत गजर कीर्तनाचा आणि मन मंदिरा या दोन्ही शोमध्ये एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. अचूक उत्तरे देणार्यांपैकी रोज ५ भाग्यवान प्रेक्षकांना कधीही आणि कुठेही कीर्तन ऐकवणारी विठू- रखुमाईची अनोखी मूर्ती बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत सरू राहणाऱ्या या स्पर्धेत कधीही आणि कुठेही कीर्तन ऐकवणाऱ्या विठू रखुमाई च्या एकूण ४५० मूर्ती बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत .
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना फक्त इतकच करायचं आहे. गजर कीर्तनाचा आणि मन मंदिरा या कार्यक्रमात रोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधायचं. त्यासाठी उत्तराचे दोन पर्याय देण्यात येणार आहेत. त्यासाठी झी टॉकीजतर्फे दोन मोबाइल नंबर देण्यात आले आहेत. यामध्ये उत्तरादाखल पर्याय क्रमांक १ साठी 7036109777 व पर्याय क्रमांक २ साठी 7036092777 या मोबाइल क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांची नावे झी टॉकीज वाहिनीवरून जाहीर केली जातील . त्यासाठी झी टॉकीज वाहिनी पाहत रहा . तसेच झी टॉकीजच्या सर्व सोशलमीडिया पेजवरही विजेत्यांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत .
कॉन्टेस्ट लिंक : https://nkr.zee5.com/contest_tnc. झी टॉकीजच्या वतीने विजेत्यांशी वैयक्तिक संपर्कही साधला जाईल. प्रेक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन झी टॉकीज वाहिनीच्यावतीने करण्यात आले आहे. ( *नियम आणि अटी लागु )