COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'श्वास' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी १३ ते १४ वर्षानंतर 'नदी वाहते' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. 


'श्वास' या सिनेमाने मराठी सिनेमाला एका नव्या उंचीवर आणून ठेवलं होतं, 'नदी वाहते' हा सिनेमा देखील त्यातलाच एक असं म्हणायला हरकत नाही.


या सिनेमाच्या निमित्ताने नदीचं महत्व तर कळणारंच आहे, पण नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकणही पाहता येणार आहे. सिनेमात खळखळणारं पाणी, आणि त्याचा आवाज, खूपच सुंदर वाटतो.


साऊंड इफेक्टस या सिनेमात तुमच्या कानावर येतील, ते अतिशय नैसर्गिक वाटतील, सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांसाठी हा आवाज तुम्हाला निश्चितच सुखावह वाटू शकतो, तर या सिनेमातील कॅमेऱ्याचे अँगल्सही अतिशय सुंदर वाटतात.