अफेअरच्या बातम्यांदरम्यान नागाची शोभिता धुलिपालासाठीची `ही` खास गोष्ट ठरतेय चर्चेचा विषय
अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो
मुंबई : अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. 2017 मध्ये नागाने अभिनेत्री समंथासोबत (Samantha Ruth Prabhu)लग्न केलं. मात्र, 4 वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले.
समंथापासून विभक्त झाल्यापासून नागा अभिनेत्री (Shobhita Dhulipala) ला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांनीही अद्याप या नात्याला दुजोरा दिलेला नसला तरी, असं असतानाही दोघंही या नात्याबद्दल सतत चर्चेत असतात. दरम्यान, पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला आहे.
नागा चैतन्यने केलं हे काम
अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Shobita Dhulipala) 30 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या 'पोन्नियिन सेल्वन' (ponniyin selvan) या चित्रपटात दिसणार आहे. त्याचवेळी, नुकताच तिने इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या पोस्टला सर्वसामान्यांपासून अनेक बड्या स्टार्सनी पसंती दिली. आणि त्याच्यामध्ये नागा चैतन्यचं (Naga Chaitanya) नाव देखील आहे. शोभिताच्या पोस्टवर नागाने प्रतिक्रिया देताच त्यांच्या नात्याच्या बातमी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
या नात्याबाबत दोन्ही बाजूंकडून आतापर्यंत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. त्याचबरोबर 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटादरम्यान नागाला एका मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलं, ज्याच्या उत्तरात नागाने काहीही न बोलता फक्त स्माईल दिली.
सामंथाही आयुष्यात पुढे जाणार आहे!
मात्र, सध्या समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, एका अहवालात असं सांगण्यात आलं की, अभिनेत्री आयुष्यात पुढे जाण्याचा आणि तिचे गुरू सद्गुरू जगदीश वासुदेव यांच्या सांगण्यावरून लग्न करण्याचा विचार करत आहे. मात्र याबाबत अभिनेत्रीकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही.