रात्री तीन वाजता नेमकं काय घडलं? नागा चैतन्यच्या Rumored Girlfriend चा Private Video खूप काही सांगतोय
व्हिडीओ अतिशय वेगानं व्हायरल
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यानं समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिच्याशी असणाऱ्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिला. नागा चैतन्य यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आणि समंथाच्या नात्यात दुरावा आल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांना धक्काच बसला.
वैवाहिक नात्यातून बाहेर पडल्यानंतर काही महिन्यांतच नागा चैतन्यचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं. सूत्रांच्या माहितीनुसार तिला नागा चैतन्यच्या घरीसुद्धा पाहिलं गेलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे शोभिता धुलिपाला. (naga chaitanya sobhita dhulipala )
मादक अदा आणि देखण्या रुपानं सर्वांनाच घायाळ करणाऱ्या शोभिताची नागा चैतन्यशी असणारी जवळीक अनेकांसाठी अनपेक्षित होती. त्यांच्या या नात्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यातच आता शोभिताचा व्हिडीओ समोर आला आहे.
रात्री उशिरा, तीन वाजण्याच्या सुमारास शोभितानं नेमकं काय केलं, हे खुद्द तिनंच एक खासगी व्हिडीओ पोस्ट करत फॉलोअर्सना सांगितलं आहे. आता तुम्ही रात्रीचा व्हिडीओ म्हटलं, तर वेडेवाकडे विचार करत असाल तर थांबा. कारण, तिचा हा व्हिडीओ आक्षेपार्ह नाहीये.
'रात को तीन बजे फुल टाईमपास.....' असं कॅप्शन देत शोभितानं नृत्य करतानाचा व्हिडीओ शेअर केला. जिथे ती कथक नृत्य करताना दिसत आहे. 'अर्जियां दे रहा है दिल...' या गाण्यावर ती सुरेख नृत्य सादर करताना पाहून नकळत आपल्याही चेहऱ्यावर स्मितहास्त उमटत आहे.
हस्तमुद्रा, हावभाव आणि लयबद्ध नृत्याचा नजराणा सादर करणाऱ्या शोभिताचा आनंदाचा हा भन्नाट मार्ग तुम्हाला कसा वाटला?