Nagarjuna Fitness Mantra : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन हा वयाच्या 65 वर्षी देखील फिट आहे. त्याच्या फिटनेसकडू पाहून अनेकांना आश्चर्य होतं. या वयातही तो जितका फिट आहे ते पाहून 30 शीतील तरुणही लाजावतील. दरम्यान, नागार्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फिटनेसविषयी खुलासा केला आहे. त्याशिवाय तो आठवड्यातून किती दिवस वर्कआऊट करतो आणि कोणत्या प्रकारचा वर्कआऊट करतो याविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागार्जुननं नुकतीच ही मुलाखत हिंदुस्तान टाईमस्ला दिली आहे. या मुलाखतीत नागार्जुननं सांगितलं की तो आठवड्यातून पाच ते सहा दिवस जवळपास एक तास वर्कआऊट करतो. त्याची वर्कआऊट करण्याची वेळ ही सकाळची आहे. दरम्यान, त्याच्या वर्कआऊट रूटिनमध्ये तो काय करतो हे सांगत त्यानं खुलासा केला की तो वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ एक्सरसाईज करतो. त्याशिवाय त्यानं सांगितलं की त्यासोबत आपले छंद म्हणजेच पोहणं आणि गॉल्फ खेळल्या त्याचं शरीर हे निरोगी राहतं आणि त्याचं डोकं देखील शांत राहतं. 



पुढे याविषयी सविस्तर सांगत नागार्जुननं खुलासा केला की 'त्याच्या फिटनेसमध्ये कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. हे सगळं मी गेल्या 30-35 वर्षांपासून करतोय. त्यामुळे फिटनेसमध्ये जर काही महत्त्वाचं आहे की सुसंगतता (consistency). मी दिवसभर काही ना काही करत राहतो. जर मी जीमला गेलो नाही तर मी वॉक करतो किंवा पोहायला जातो. एकवेळ मी काही काम करणार नाही पण मी वर्कआऊट करणं टाळणार नाही. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं कोणतं काम करणं गरजेचं आहे तर ते वर्कआऊट करणं आहे. आठवड्यातील पाच दिवस तर मी नक्कीच वर्कआऊट करतो. जर शक्य असेल तर सहा दिवस. सकाळी मी 45 मिनिटं ते एक तास वर्कआऊट करतो. पण हे खूप इंटेन्स वर्कआऊट असतं साधं-सोपं नसतं.'


नागार्जुननं टिप्स देत त्याच्या ट्रेनरनं दिलेला सल्ला सांगितला आहे. त्यानं सांगितलं की 'एक ट्रिक जी त्याच्या ट्रेनरनं त्याला खूप आधी सांगितली होती. मग कार्डिओ एक्सरसाईज असो किंवा मग स्ट्रेंथ ट्रेनिंग, तुमची हार्टबीट तुमच्या नेहमीच्या हार्टबीट पेक्षा 70 टक्क्यांनी जास्त असायला हवी.'


त्यानं यावेळी सांगितलं की 'त्यामुळे वर्कआऊटच्या मध्ये जास्त ब्रेक घेऊ नका. जास्त वेळ बसू नका. तुमचा फोन सतत तपासू नका. फक्त तुमच्या वर्कआऊटवर लक्ष केंद्रित करा आणि याकडे लक्ष ठेवा की एका ठरावीक लेव्हलवर तुमची हार्टबीट असू द्या आणि त्यामुळे तुमचं मेटाबॉलिजीम हे दिवसभर चांगलं असेल. तुमच्या शरीरासाठी 1 तास ते 45 मिनिटं द्या त्यानं इतर गोष्टी या व्यवस्थित राहतील. त्याशिवाय खूप पाणी प्या आणि पुरेश झोप घ्यायला विसरू नका.' 


हेही वाचा : अभिनेत्यानं 25 दिवसात 16 किलो वजन केलं कमी; म्हणाला, 'मी मूर्ख होतो, असं डायट केलं ज्यानं एका कलाकाराचा...'


नागार्जुन त्याच्या आहाराविषयी बोलताना म्हणाला, 'इतक्या वर्षात आता माझं डायट हे बदललं आहे. तुम्ही देखील असंच करायला पाहिजे कारण तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी जे खाऊ शकत होतात ते आता खाऊ शकत नाही. त्यामुळे जेवणात केलेले काही बदल हे नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी मदत करतील.'