रुग्णालयात दाखल केल्यानंतर नकुल मेहताच्या हेल्थबाबत मोठी बातमी समोर
अभिनेता नकुल मेहताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : 'बडे अच्छे लगते हैं 2' फेम अभिनेता नकुल मेहता नुकताच आजारी पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नकुलने गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीची माहिती दिली होती. नकुलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले होते. नकुलवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो आता बरा झाला आहे. नकुलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नकुलच्या डिस्चार्जची बातमी समजल्यानंतर त्याचे चाहते खूप आनंदी होतआहेत.
एका रिपोर्टनुसार, नकुलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळीच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला तर 8 ते 10 जून पर्यंत तो कामावर परतणार आहेत.
अपेंडिक्सचं झालं ऑपरेशन
रिपोर्टनुसार, नकुलला मुंबईतील सुजॉय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. एका रिपोर्टनुसार, नकुलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला ५ ते ७ दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आली आहे.
पोस्ट केली शेअर
नकुलने पोस्ट शेअर करून चाहत्यांना सांगितलं की, त्याच्यावर अॅपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे. त्याने लिहिलं की, माझी आई नेहमी म्हणायची की, आयुष्य चॉकलेटच्या बॉक्ससारखे आहे तुम्हाला काय मिळणार आहे हे कधीच माहीत नाही. २४ तासांच्या कालावधीत सेलिब्रेशन करून आम्हाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मला वाटलं कामाचा परिणाम होणार आहे पण पुन्हा आयुष्यात आणखी काही योजना आहेत.