मुंबई : टीव्ही मालिका 'बडे अच्छे लगते हैं 2' फेम नकुल मेहताबद्दल एक मोठी आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे. शोमध्ये रामची भूमिका साकारणाऱ्या नकुलची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी समोर येताच चाहते निराश झाले आहेत. आता नकुलचे चाहते त्याच्या तब्येतीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नकुलची तब्येत पुन्हा बिघडली
प्रकृती अस्वास्थ्यामुळे नकुल मेहताला रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर छोटी शस्त्रक्रियाही केली आहे. शस्त्रक्रियेनंतर अभिनेता पूर्ण विश्रांती घेत आहे. दरम्यान, त्याने बडे अच्छे लगते हैं २ चे शूटिंगही थांबवल्याचं वृत्त आहे. आता नकुल मेहता शोमध्ये परत कधी येणार. याबाबतची माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही.


चाहत्यांमध्ये निराशा 
ही बातमी समोर येताच त्याचे चाहते लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे, वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नकुल सध्या 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये दिसत आहे. या मालिकेत तो अभिनेत्री दिशा परमारसोबत रोमान्स करताना दिसत आहे.