Namrata Sambherao : महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमातील 'लॉली' म्हणजेच नम्रता संभेराव सगळ्यांच्या लक्षात राहणारी आहे. नम्रता सध्या अमेरिकेत आहे. आता नम्रता अमेरिकेत का आहे असा प्रश्न तुम्हाला असेल? नम्रता तिच्या 'कुर्रर्रर्र' या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्तानं अमेरिकेत गेली आहे. अमेरिकेत प्रयोग असल्यानं नम्रता गेल्या महिन्याभरापासून तिच्या मुलापासून लांब आहे. आता नम्रतानं सोशल मीडियावर तिचा मुलगा रुद्रराजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नम्रतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. नम्रतानं तिचा मुलगा रुद्रचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओक रुद्र आणि नम्रता हे दोघं गाणं गातांना दिसत आहेत. या व्हिडीओत नम्रता आणि रुद्र दोघं एकटी एकटी घाबरलीस ना हे गाणं गाताना दिसली. कॅमेऱ्यात फक्त रुद्र दिसत असताना कॅमेऱ्याच्या मागून गाणं गात नम्रता मुलगा रुद्रचा हा व्हिडीओ शूट करताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत नम्रतानं कॅप्शन दिलं आहे की 'एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळे पाणवतात लवकरच परत येतेय कधी एकदा तुला घट्ट मिठी मारतेय असं झालंय. कारण मी खरंच शूर नाही, हे मी इतकं लांब आल्यावर माझ्या लक्षात आलंय कारण क्षणोक्षणी तुझी आठवण आली पण आता मला खात्री आहे. माझा सगळा भित्रेपणा छूमंतर होणार कारण लवकरच मी माझ्या शूर बाळाला भेटणार आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : हा कसला Attitude! मराठी अभिनेत्री तिच्या मागे धावत गेली, पण... Kareena Kapoor च्या कृत्यावर महेश टिळेकर संतापले


नम्रतानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी कमेंट करत नम्रताच्या मुलाची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'किती गोड आहे हा मला त्याला भेटायचं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खरंच मुला पासून दूर राहणं अवघड आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आईही मुलाच्या आयुष्याची शिल्पकार असते.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'कित्ती गोड! स्पष्ट उच्चार! लेक शोभतो!' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लहान पणी माझी हेअरस्टाईल अशीच होती.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'उच्चार अगदी स्पष्ट आणि खणखणीत.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'माझेही डोळे पाण्वले किती गोड.'