`या` अभिनेत्रीमुळे नाना आणि मनीषा यांची `अधुरी कहानी...`, कोण होती ती?
नाना आणि मनीषा याचं नातं तुटल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का...
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रेम प्रकरणं आहेत, ज्यांची सुरुवात प्रचंड उत्तम झाली. शेवट मात्र चाहत्यांना हादरवणारा होता. अशीच एक लव्ह स्टोरी म्हणजे अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) आणि अभिनेत्री मनीषा कोईराला (manisha koirala) यांची. मनीषा आणि नानांच्या ब्रेकअपच्या (break-up)चर्चा कायम चर्चेत असतात.. ज्या प्रकारे दोघांची लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्याचा शेवटही तितकाच वाईट झाला. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या नात्याच्या चर्चा असायच्या.
कशी सुरू झाली दोघांची लव्ह स्टोरी (Nana Patekar and Manisha Koirala )
नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी 'अग्निसाक्षी' सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमांत दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला जेव्हा 'खामोशी द म्युझिकल' मध्ये एकत्र काम करत होते. तेव्हा दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
सिनेमात मनीषाच्या वडिलांचा एक मामा देखील होता. या दोघांच्या नात्याबद्दल त्यांना कळालं. जेव्हा दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली तेव्हा नानांचं आधीच लग्न झालं होतं. असे म्हणतात की, नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलाकांती यांचं नातं ठीक नव्हतं. असंही म्हटलं जातं की, त्यावेळी नीलाकांती त्यांच्यापासून वेगळ्या राहायच्या. (nana patekar And manisha koirala break-up)
नानांच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेल्या मनीषाला त्यांच्या नात्याला नाव द्यायचं होतं. तिला नाना पाटेकर यांच्याशी लग्न करायचं होतं. पण नाना यांना आपली पत्नी निलकांतीशी घटस्फोट घ्यायचा नव्हता. नानांची नाराजी आणि लग्न न करण्याच्या निर्णयामुळे मनीषा त्यांच्यापासून दूर जावू लागली
बातमीनुसार, जेव्हा मनीषाने नाना यांना दुसर्या अभिनेत्रीसोबत पाहिलं. तेव्हा या दोघांच्या नात्यात कटूता निर्माण झाली. अभिनेत्री आयशा जुल्काला (Ayesha Jhulka) नानांसोबत पाहिल्यानंतर मनीषाला मोठा धक्का बसला.
त्यानंतर नानांनी मनिषाकडे लग्नासाठी आग्रह केला. पण मनिषा यांनी नातं पूर्णपणे तोडलं. (manisha broak relation) मनिषा आणि नाना जेव्हा विभक्त झाल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. कोणालाही विश्वास बसत नव्हता की, आता मनीषा आणि नाना पुन्हा कधीही एकत्र दिसणार नाहीत