नाना पाटेकरांनी बादशाहच्या रॅपची उडवली खिल्ली; हटके अंदाजात उत्तर देत रॅपर म्हणाला, `तुम्ही ऐकलं असतं तर...`
Nana Patekar - Badshah : नाना पाटेकरांनी बादशाची खिल्ली उडवताच रॅपरनं दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल
Nana Patekar - Badshah : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे लोकांमध्ये त्यांच्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात. नुकतीच नाना पाटेकर यांनी ‘इंडियन आइडल 15’ व्या सीझनमध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तेव्हा नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. दरम्यान, यावेळी शोमध्ये त्यांनी रॅपर बादशाहची मस्करी देखील केली. त्याची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘इंडियन आइडल 15’ चा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नाना पाटेकर हे बादशाहला त्याच्या गाण्याविषयी विचारतात. खरंतर, एका स्पर्धकाची आई बादशाहला त्याच्या रॅपिंग स्किल्सविषयी विचारते, तर नाना पाटेकर यावर बोलताना दिसतात की बेटा मी कधीच तुला ऐकलं नाही, कशा प्रकारचं असतं ते? नाना पाटेकरांचं हे वक्तव्य ऐकताच बादशात आधी थोडं शांत झाला आणि नंतर तो म्हणाला, ज्या प्रकारे तुम्ही इथे आलात; मला खूप प्रेमाने भेटलात. जर तुम्ही ऐकलं असतं तर इतक्या प्रेमाने भेटला नसतात. बादशाहनं हे वक्तव्य करताच नाना पाटेकर यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्याचे दिसून आले. ते काही न बोलता त्यांची नाराजगी व्यक्त करताना दिसले. नाना पाटेकर पुन्हा स्पर्धक रितिकाच्या आईला बोलतात की जर तुम्ही आता जे बोललात त्याला रिदममध्ये टाकलं तर ते देखील रॅप होईल. शोचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
बादशाहच्या सिंगिंगची या आधी देखील खिल्ली उडवण्यात आली आहे. रॅपरनं जेव्हा श्री श्री रविशंकर यांना महादेवावर असलेला रॅप ऐकवला तर ते म्हणाले त्याला म्हणाले की त्यांनी आत जी ओळ वापरली ती गाण्यात गाऊन दाखव.
हेही वाचा : प्रदर्शनाआधीच 'पुष्पा 2' रचला इतिहास; अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं मोडला 52 वर्षांचा रेकॉर्ड
‘इंडियन आइडल 15’ विषयी बोलायचं झालं तर विशाल ददलानीसोबत श्रेय घोषाल आणि बादशाह परिक्षक आहेत. नाना पाटेकर या शोमध्ये त्यांचा आगामी चित्रपट ‘वनवास’ च्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि दिग्दर्शक अनिल शर्मा देखील उपस्थित होते.