`म्हणून मी 19 वर्षं तुझ्यासह काम केलं नाही`, नाना पाटेकरांनी मुलाखतीतच अनिल कपूरला झापलं, `तू एवढा बकवास माणूस...`
परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा आरोप नाना पाटेकर यांनी आधीही केला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी थेट अनिल कपूरसमोरच हा आरोप केला.
परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा आरोप नाना पाटेकर यांनी आधीही केला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी थेट अनिल कपूरसमोरच हा आरोप केला. अनिल कपूरने आपली भूमिका जॅकी श्रॉफला दिल्यामुळे प्रचंड नाराज झालो होतो असा खुलासा नाना पाटेकर यांनी केला आहे. अनिल कपूरने यावेळी आपण सुचवलं असलं तरी अखेरचा निर्णय दिग्दर्शकाचा असतो असं स्पष्टीकरण दिलं.
नाना पाटेकर यांच्या आगामी 'वनवास' चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनिल कपूरने नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मुलाखतीदरम्यान 1989 मधील परिंदा चित्रपटाचा विषय निघाला. नाना म्हणाले की, "तू मला परिंदाच्या वेळी फार त्रास दिला होता. मी खरं तर तुझ्या भावाची भूमिका निभावणार होतो. आपण रिहर्सलही केली होती. पण नंतर अनिलमुळे जॅकीला ती भूमिका देण्यात आली".
पुढे नाना म्हणाले की, "पण मला त्याचे आभार मानायचे आहेत, कारण जर त्याने जॅकीसाठी आग्रह केला नसता तर मला अन्नाची भूमिका मिळाली नसती". यावेळी अनिल कपूरने आपली बाजू मांडत सांगितलं की, "तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी हम पाँचचा कास्टिंग डायरेक्टर होतो. मी अशी अनेक कामं केली आहेत. मी कास्टिंगमध्येही होती. मी अभिनेत्यांना सेटवर घेऊन जायचो. मिथूनला घरुन सेटवर घेऊन जायचो. मी ही सर्व काम केली आहेत. हम पाँचच्या कास्टिंगमध्ये माझी फार मोठी भूमिका होती. मी कदाचित चुकीचा असेन, पण मला परिंदामध्ये भावाच्या भूमिकेसाठी जॅकी जास्त योग्य असेल असं वाटलं. मी फार प्रामाणिकपणे सांगत आहे".
नाना त्यावर म्हणाले की, "तुझ्या प्रामाणिकपणे मी भूमिका निभावली. तुझ्या लक्षात आलं नसेल मात्र मी त्यानंतर 19 वर्षं तुझ्यासोबत काम केलं नाही. मी म्हटलं, हा तर फार बकवास माणूस आहे". त्यावर अनिलने सांगितलं की, "मी तुमच्याविरोधात नव्हतो, मी फक्त दिग्दर्शकाला सुचवलं होतं. अंतिम निर्णय त्यांचाच होता. हे लोक नेहमी हिरोच्या खांद्यावरुन बंदूक चालवतात हे लक्षात ठेवा".
त्यावर नाना यांनी त्यावेळी तू स्टार होतास, तुझं ऐकावंच लागलं असतं असं म्हटलं. नंतर त्यांनी जॅकीने फार चांगलं काम केलं. त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला अशी आठवण सांगितली.
अनिल इतक्यावरच थांबला नाही तो म्हणाला, “आमचं कुटुंब 60 वर्षांपासून चित्रपट व्यवसायात आहे, कृपया हे समजून घ्या की मी कोणत्याही गोष्टीसाठी चित्रपटाशी तडजोड करणार नाही. इतक्या वर्षानंतरही आपण मित्र आहोत,". नानांनी अनिलला वनवासाच्या प्रमोशनमध्ये मदत केल्याबद्दल आभार मानले, पण पुढे म्हणाले, “तू आता बदलला आहेस, पण तेव्हा तू स्टारप्रमाणे वागायचा”.