मुंबई : टेलिव्हिजन अभिनेता नंदीश सिंह संधू दोन चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हे दोनही चित्रपट एका पाठोपाठ एक प्रदर्शित होणार आहेत. हृतिक रोशन स्टारर 'सुपर ३०' चित्रपटातून नंदीश हृतिक रोशनच्या भावाची भूमिका साकारणार आहे. 'सुपर ३०' १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात नंदीश 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदीशने चित्रपटांबाबत बोलताना, 'दोन्ही चित्रपट अतिशय वेगळे असून मला दोनही चित्रपट एका पाठोपाठ एकाच महिन्यात प्रदर्शित होत असल्याचा आनंद आहे. 'सुपर ३०' मध्ये मी एक वास्तविक पात्र साकारणार आहे, जे एका व्यक्तीचा संघर्ष आणि त्या संघर्षातून मार्ग काढत कशाप्रकारे आपलं लक्ष भेदण्यास यशस्वी ठरतात, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याचं' त्याने सांगितलं.



तर '...ठाकुरगंज' हा चित्रपट अतिशय मजेशीर फॅमिली ड्रामा थ्रिलर आहे. ज्यावेळी मी या चित्रपटाचं स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी मी १९७०-८०च्या दशकात गेलो. चित्रपटात मी एका प्रोफेसरची भूमिका साकारत आहे. 'फॅमिली ऑफ ठाकुरगंज' हा 'सुपर ३०'हून अतिशय वेगळा असल्याचं' त्यानं म्हटलंय.



नंदीश सिंह संधूने याआधी टेलिव्हिजनवरील 'उतरन', 'कस्तुरी' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आणि इतरही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. नंदीशने 'नच बलिये ७' मध्येही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.