एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा आणि साराला समन्स
बॉलिवूडला मोठा धक्का
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अत्महत्येनंतर ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आले आहेत. याप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण , श्रद्धा कपूर आणि सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीने समन्स पाठवल्याची माहिती आहे. त्यामुळे एनसीबीकडून चौकशीकरता बोलवण्यात येऊ शकतं. उद्या म्हणजे गुरूवारी सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे
सुशांत आत्महत्या प्रकरणी आता बॉलिवडू विश्वातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान, सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान ड्रग्स प्रकरणी २५ जणांची नावे घेतली. त्यामध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंगच्या नावाचा उल्लेख केला. एनसीबीतील सूत्रांनुसार, जया साह नावाची महिला रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ पोहोचवत होती, असं दोघींमधील चॅटमधून समोर आले आहे.
ड्रग्स प्रकरणामध्ये जया साहला एनसीबीनं समन्स बजावले आहे. त्याचप्रमाणे सुशांतची मॅनेजर श्रृती मोदी हिलादेखील समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान दीपिका ड्रग्स प्रकरणी जया शिवाय अन्य महिलांच्या देखील संपर्कात होती, असा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे एनसीबीने दीपिकाला देखील समन्स पाठवले आहे.