मुंबई : बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यावर लोकं लवकरच विसरतील, असं अनेकांनी अभिनेत्री नर्गिस फाखरीला समजावलं होतं. लोकंच नाही तर निर्माता-दिग्दर्शकही अनेकदा ब्रेक घेणार्‍या अभिनेत्रींना विसरतात.  रणबीर कपूरसोबत रॉकस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नर्गिसला आता बहुतेकांना फक्त उदय चोप्राची एक्स गर्लफ्रेंड म्हणूनच आठवते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षांच्या पूर्ण विश्रांतीनंतर नर्गिस काही काळ बॉलीवूडमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यात तिला यश आलं नाही. होय, पुन्हा एकदा ती प्रेक्षकांसमोर आपली उपस्थिती नोंदवायला येत आहे. पण तिचे पुनरागमन बॉलीवूडमधून नाही तर साऊथच्या चित्रपटातून होत आहे. नर्गिस येत्या काही दिवसांत पवन कल्याणसोबत 'हरी हरा वीरा मल्लू' या तेलगू चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात निधी अग्रवाल आणि अर्जुन रामपाल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


नरगिस कुठे गायब होती
नर्गिस अचानक गायब झाल्यामुळे तिने इंडस्ट्री सोडली असं लोकांना वाटू लागलं. नर्गिस अभिनेता उदय चोप्रासोबत अमेरिकेत स्थायिक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघंही लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण फाखरीने 2017 मध्ये उदयसोबत ब्रेकअपची घोषणा केली. 2013 मध्ये दोघांची मैत्री झाली होती. 2018 मध्ये, नर्गिसने स्वत: चित्रपट निर्माता मेट अलोन्झोसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं उघड केलं होतं.


तिने 2011 मध्ये रणबीर कपूरच्या रॉकस्टारमधून पदार्पण केलं. त्यानंतर नर्गिस फाखरीचा शेवटचा मोठा चित्रपट बँजो 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि त्यानंतर ती जवळजवळ गायब झाली. तिचे तीन चित्रपट मध्यंतरी कधी आले, कधी गेले ते कोणालाच कळलं नाही.