वादग्रस्त वक्तव्याला विरोध झाल्यावर नसीरूद्दीन शाह यांची सारवा सारव
पाहा काय म्हणाले
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कुणी आपले विचार मांडले तर लोकं त्याला कडाडून विरोध करतात. असंच काहीस बॉलिवूड अभिनेता नसीरूद्दीन शाह यांच्यासोबत झालं आहे. गुरूवारी मुलांच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या वक्तव्यावर कडाडून विरोध होत आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मी जे काही बोललो ते एका चिंतेत असलेल्या भारतीयाच्या रुपात बोललो. मी यावेळी असं काय बोललो ज्याच्यामुळे मला एका गद्दारच्या रुपात पेश केलं जात आहे.
मी त्या देशातील चिंता व्यक्त करत आहे ज्या देशावर माझं प्रेम आहे. ज्या देशात माझं घर आहे. यामध्ये माझा काय अपराध आहे.
राजस्थाच्या अजमेरमध्ये आयोजित केलेल्या लिटरेचर फिल्म फेस्टिवलमध्ये बॉलिवूड अभिनेता नसीरूद्दीन शाह यांना कडाडून विरोध झाला.
नसीरूद्दीन शाह शुक्रवारी अजमेरच्या त्या शाळेत गेले जेथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. या शाळेबाहेर तरूणांनी खूप विरोध केला. यावेळी कार्यक्रमाचे पोस्टर्स देखील जाळले.
हिंदुस्तान जिंदाबादचे नारे देत नसीरूद्दीन शाह यांना वंदे मातरम् बोलावं लागेल जर त्यांना भारतात राहायचं तर अशा घोषणा केल्या.
युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणाले की, ज्या देशातून तुम्ही दोन वेळेच अन्न कमावले, नाव आणि पैसा कमावला तिथेच राहायला तुम्हाला भीति वाटत आहे? देशाला मान खाली घालावी लागेल म्हणून असं वक्तव्य तुम्ही केलं. युवा मंचाचे लोकं जागरूक आहेत ते त्यांना याचं उद्घाटन करू देणार नाही.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, देशात आता जे वातावरण आहे त्या वातावरणात राहायला भीती वाटते. असं न होवो की उद्या मुलांना कुणी गल्लीत उभं करून विचारलं की, तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम तर... नसीरूद्दीन शाह यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध होत आहे. देशभरात या वक्तव्यावर पडसाद उमटत आहेत.