Ajay Devgn : बॉलिवूड कलाकारांचे पोस्टर आपण सगळीकडे पाहतो. कधी कोणत्या दुकानात जाहिरातीसाठी असतात तर कधी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी. कलाकार त्यांच्या चाहत्यांची काळजी घेतना दिसतात. त्यांनी केलेल्या कृत्यानं चाहते नाराज होणार नाही ना, याचा अनेक लोक विचार करतात. पण बऱ्याचवेळा त्यांचे चाहते नाराजी व्यक्त करतात. जाहिरातींवरून अनेक कलाकारांना ट्रोल करण्यात आल्याचं आपण पाहतो. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान हे त्यांच्या गुटख्याच्या जाहिरातीमुळे चर्चेत आले होते. त्यांचा चाहत्यांनी विरोध केला होता. आता तर नाशिकमध्ये असलेल्या एका चाहत्यांना एका वेगळ्या पद्धतीनं अजय देवगणचा विरोध केला आहे. ही व्यक्ती थेट अजय देवगणचा फोटो स्कुटीला लावून भीक मागताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती अजय देवगणचा फओटो स्कुटीला लावून भीक मागताना दिसत आहे. ही व्यक्ती अजय देवगणच्या ऑनलाइन गेमच्या प्रमोशनच्या विरोधात आहे. ऑनलाइन गेमच्या विरोधात हे आंदोलन आहे. तर त्यामुळे नव्या पिढीला खराब करत आहेच. इतकंच नाही तर थ्रीस्टार क्रिकेटर या जाहिरातीकरून पैसे कमवत आहेत. त्यासाठी अजय देवगणसाठी भीक मागू आंदोलन करून पैसे पाढवून गांधींच्या पद्धतीनं विनंती करणार आहे की अशा प्रकारच्या जाहिराती करू नका आणि जर पैशाची आवश्यकता असेल तर मी पुन्हा भीक मागेन आणि तुम्हाला पैसे पाठवेन. त्यासाठी त्या व्यक्तीनं इतरांना पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. कसा पाठिंबा द्याल हे सांगितले ती व्यक्ती म्हणाली की तुम्ही फोननं फोटो किंवा व्हिडीओ शूट करून शेअर करा, असं सांगितलं आहे. तर त्या व्यक्तीचा हा व्हिडीओ मुंबई न्यूज या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. 



 हेही वाचा : आमिरला 7-8 वेळा KISS करणाऱ्या अभिनेत्रीची नजरा वळवणारी प्रतिक्रिया, म्हणाली...


या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करा, 'देवाच्या कृपेनं तुझ्याकडे खूप काम आहे. या ऑनलाइन गेम आणि गुटख्याच्या जाहिरातीतून इतका पैसे मिळतो का की तुम्ही त्याच्या जाहिराती करतात. त्यामुळे पुढच्या पीढीला त्याचे व्यसन लागते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अगदी बरोबर बोलावून दाखवल ... भरपुर दिला  कलाकाराला काय गरज होती ही फालतूच धंधे करायच आता तर जागा मुंबईकर ... जय हिंद जय महाराष्ट्र...' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कोणीतरी बोलायची हिंमत केली हे सगळ्यात चांगलं आहे.'