मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या नात्यानं कायम समाजातील काही रुढींना शह देण्याचं काम केलं आहे. कलाजगत आणि रंगमंच कोळून प्यायलेल्य़ा या दोन्ही कलाकारांचं नाव मानाच्या कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. (naseeruddin shah, ratna pathak shah)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्ना पाठक यांनी नाटकातून भूमिका साकारत चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं. तिथेच त्यांना नसिर यांच्या रुपात आयुष्यभराचा जोडीदार मिळाला. 


त्यांची प्रेमकहाणी कोणा एका चित्रपटाहून कमी नाही. वयाच्या 19 व्या वर्षीच नसिर त्यांच्या कुटुंबापासून दुरावले. AMU मध्ये शिकणाऱ्या एका मेडिकलच्या विद्यार्थीनीशी त्यांनी लग्न केल्याची माहिती समोर आली. 


सूत्रांच्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर 1969 मध्ये दोघांचं लग्न झालं. पण, त्यांच्या नात्यात लगेचच दुरावा आला. त्यांचा औपचारिक घटस्फोट नाही झाला. 


1975 मध्ये रत्ना नसिर यांच्या आयुष्यात आल्या. तेव्हाच त्यांची पहिली भेट झाली. 


सत्यदेव दुबे यांच्या 'संभोग से संन्यास' तक अशा नाटकात त्यांनी काम केलं. त्याचवेळी त्यांची मैत्रीही झाली. इथपासून त्यांच्या नात्याचा प्रवास सुरु झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


बघता बघता शाह आणि रत्ना यांच्यातील जवळीक वाढत गेली. एकमेकांसोबत ते प्रवास करु लागले. विविध ठिकाणी जाऊ लागले. 


ही वेळ तेव्हाचीच होती जेव्हा नसिर त्यांच्या दु:खातून बाहेर येण्याचा, मागच्या नात्यांना विसरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी रत्ना यांनी त्यांच्या मानसिक जखमांवर औषधांचं काम केलं. 


धर्माची पाळंमुळं दोघांसाठी वेगळी होती. पण, त्यांच्या नात्याच्या आड कधीच ही बाब आली नाही.


नसिर परवीनपासून वेगळे राहत होते. त्यांचा घटस्फोट झालेला नव्हता. ज्यामुळं त्यांनी सुरुवातीला रत्ना पाठक शाह यांच्याशी लग्न केलेलं नव्हतं. 


सुरुवातीला विवाहित असूनही पत्नीपासून विभक्त असणारे नसिर रत्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. 


1 एप्रिल 1982 मध्ये त्यांनी रत्ना यांच्या आईच्याच निवासस्थानी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. दोघांचेही आईवडील आणि अगदी खास मित्र इतक्याच मंडळींची त्यांच्या या खऱ्याखुऱ्या घरगुती सोहळ्याला हजेरी होती.