नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला सिनेमाची ऑफर, जाणून घ्या का दिला तिने या सिनेमाला नकार
रश्मिकाला तेलुगू जर्सीच्या हिंदी रिमेकसाठीही विचारण्यात आलं होतं, परंतु तिनं हा सिनेमा करण्यास तिनं नकार दिला.
मुंबई: रश्मिका मंदना साऊथमध्ये धमाकेदार सिनेमात दिसल्यानंतर आता लवकरच ती बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करणार आहे. तिच्या हातात बॉलिवूडचे 2 मोठे सिनेमा आहेत. 'मिशन मजनू' या सिनेमातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासोबत रश्मिका स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच रश्मिकाने देखील सिद्धार्थसोबत मिशन मजनूच्या सेटमवरील एक फोटो शेअर केला आहे. रश्मिकाला तेलुगू जर्सीच्या हिंदी रिमेकसाठीही विचारण्यात आलं होतं, परंतु तिनं हा सिनेमा करण्यास तिनं नकार दिला.
एका रिपोर्टनुसार रश्मिकाने जर्सी या सिनेमासाठी सुरुवातीला होकार दिला होता. पण, वृत्तानुसार, रश्मिकाला वाटलं की ती श्रद्धा श्रीनाथची भूमिका पार पाडू शकणार नाही म्हणून तिने हा प्रोजेक्ट करण्यास नकार दिला.
रश्मिकाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, ज्या चित्रपटात मी १००% देवू शकणार नाही असं जेव्हा मला वाटत तेव्हा मी अशा सिनेमांना नकार देते. आणि म्हणूनच मी हो म्हणत नाही. जर्सीचा रिमेक खूप मोठा आहे. कोणीही हा सिनेमा करू शकतो परंतु मला सेटवर रहाण्याची पूर्ण दिवस इच्छा नसते आणि मला दिवसभर थकवा जाणवतो. ती पुढे म्हणाले की, चित्रपट निर्माते एखाद्याला चांगल्या माणसाला डिसर्व करतात, अशी एखादी व्यक्ती जी आपली संपूर्ण एनर्जी देऊ शकते.
मृणाल ठाकूर जर्सीमध्ये शाहिदसोबत दिसणार
जर्सीच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाचं दिग्दर्शन गौतम तिन्नोरी करीत आहेत. गौतमनेच या चित्रपटाच्या तेलुगू वर्जनला दिग्दर्शित केलं होतं. जर्सीची कहाणी अशाप्रकारे आहे की, वयाच्या 30व्या वर्षी क्रिकेट संघाचा एक सदस्य हिस्सा बनू ईच्छितो.
अमिताभ बच्चनसोबत दिसणार गुडबॉयमध्ये
रश्मिका मंदानाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबॉय या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण चंदीगड येथे सुरु आहे. गुडबॉयची कहाणी वडील आणि मुलीच्या नात्याबद्दल आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. या सिनेमातुन टीव्ही अभिनेत्री शिविनही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. शिविनने बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.