Valvi Won Best Marathi Film National Award: ​  National Film Awards Valvi Movie :  ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा 'वाळवी' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यासोबतच राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांमध्ये 3 मराठी सिनेमांचा देखील समावेश आहे. 'मरमर्स ऑफ द जंगल' या मराठी चित्रपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. तर 'वाली' या सिनेमाला मराठीमधील बेस्ट फिचर फिल्मचा अवॉर्ड देण्यात आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुबोध भावे यांची प्रतिक्रिया


आपल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची भावना आहे. पण सर्वात जास्त आनंद वाटतोय तो म्हणजे माझ्या दोन्ही मित्रांविषयी. परेश मोकाशी यांनी दिग्दर्शक केलं आहे . बरेच दिवस ते वेगवेगळे चित्रपट देत आहेत. 'वाळवी' हा अत्यंत आगळा वेगळा विषय होता. त्यामुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचं भाग्य आहे की त्यांनी आम्हाला या चित्रपटात घेतलं. वाळवी चित्रपट करताना देखील आम्ही असाच विचार केला होता की हा चित्रपट चांगला करू जेणेकरून तो प्रेक्षकांना देखील आवडेल. 


'वाळवी' चित्रपटाची कथा


'वाळवी'मध्ये अनिता दाते आणि स्वप्नील जोशी या जोडप्याची ही गोष्ट आहे. या दोघांचं नाते आता पूर्वीसारखे राहिले नाही. अनिकेतचं देविकाशी  (शिवानी सुर्वे) सूत जुळलं आहे. त्यामुळे अवनीला वैतागलेला अनिकेत हा तिला घटस्फोट मागत आहे. मात्र, ती घटस्फोट देण्यासाठी तयार नाही. अवनी आणि अनिकेत कर्जबाजारी झाल्याने जगाला कंटाळून दोघेही एकत्र आत्महत्या करण्याचा बेत आखतात. सर्व प्लॅनिंग देखील होतं. बंदुका देखील लोड होतात. ठरल्याप्रमाणे सुसाइड नोट देखील तयार होते. अशातच एक एक नवीन ट्विस्ट येतो आणि चित्र-विचित्र गोष्टी घडू लागतात.