मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : (Navtari 2022) गायिका फाल्गुनी पाठक (falguni pathak) या क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर करत असल्याच्या विरोधात एका पत्रकाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईतील एका पत्रकाराने मुंबई उपनगरातील दिवंगत प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संगीतमय कार्यक्रमांसाठी होणारे व्यावसायिक वापर रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. (Navratri 2022 PIL filed against garba queen falguni pathak)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांनी वकील मयूर फारिया यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai BMC) विकास आराखड्यात हे मैदान क्रीडांगण म्हणून निश्‍चित करण्यात आले होते. 


बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या आयोजकांनी फाल्गुनी पाठकसोबत 10 दिवस नवरात्रीचा उत्सव आयोजित करण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आल्यानंतर सानप यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. 


(Sports Complex) क्रीडा संकुलाची मैदानं जनतेसाठी नेहमीच खुली असली पाहिजे आणि कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी मैदानाचा वापर होता कामा नये. खेळाच्या मैदानाचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केला जात असेल तर ते सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात यावे असे याचिकेत म्हटले आहे. मुंबईत खूप कमी खुली मैदाने आहेत की जिथे नागरिक ताजी हवा घेऊ शकतात. मैदान असे बंदिस्त केले जाऊ शकत नाही आणि लोकांना तिथे जाण्यापासून अडवले जाऊ शकत नाही असेही याचिकेत म्हटले आहे. 


Navratri 2022 : जाणून घ्या कधी आहे घटस्थापना आणि पूजा विधी...


 


या याचिकेत मुंबई विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक हे पूर्णपणे पक्षपाती असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्यांनी निविदांचा जाहीर लिलाव न मागवता स्पर्धेसाठी खेळाचे मैदान देऊन आयोजकांची मर्जी राखली असल्याचा आरोप केला आहे. या याचिकेवर 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या फाल्गुनी पाठक यांच्या नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांच्या किंमती ₹800 ते  ₹4200 पर्यंत आहेत.