मुंबई : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महापूराने सर्वत्र थैमान घातले होते. एककाळ असा होता धरतीला पावसाच्या पाण्याची वाट पाहावी लागत होती. पण आता बळीराजा त्याच्या डोळयांनी सर्व काही वाहून जाताना बघत आहे.  नवरात्रीच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सृष्टीच्या विनाशाचं दाहक वास्तव नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या, तिसऱ्या दिवशी जरीमरी आई, चौथ्या दिवशी महालक्ष्मी, पाचव्या दिवशी शेरावाली माता अशा रुपांमध्ये दिसणाऱ्या तेजस्विनीने साहव्या दिवशी 'तुळजाभवानी'चं रूप धारण केलं आहे. 


'जिथे सगळीकडे महापूर थैमान घालत होता ...तिथे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत होते मी जिथे एकीकडे बळीराजाने वाहून जाणारी शेतं पाहिली... तिथे भेगाळलेल्या भूमीवर फासावर लटकलेल्या भूमिपुत्रांची माता मी जिथे मुकी लेकरं पाण्यात वाहून जात होती... 


तिथे चारा छावणीत भुकेलेली माझी लेकरं पाहिलेली मीजिथे पाण्यानी संसार उध्वस्त झाले... तिथे पाण्याअभावी रिकामी होत चाललेली गावे भोगलेली मी पाण्याने वाट्टोळं नाही झाले म्हणून सुखावू मी ? की करपणाऱ्या भविष्याची काळजी करू मी....या प्रश्नांत अडकलेली मी !' अशा प्रकारचे वास्तवदर्शी फोटो शेअर करत ती समाजामध्ये जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.