मुंबई : नवरात्रोत्सवाचे आज तिसरा दिवस. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज सफाई कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तेजस्विनी पंडित कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहे. पहिल्या दिवशी तिने डॉक्टरांची कृतज्ञता व्यक्त केली तर दुसऱ्या दिवशी पोलिसांची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस्विनी या फोटोंसोबत छान कॅप्शनही शेअर करत आहे. तृतीया ...मला ना lockdown ची सुट्टी,... ना work from home ची मुभा...तुझ्या स्वच्छ श्वासासाठी....देह हा माझा सदैव उभा....देह हा माझा सदैव उभा..... अशी छान पोस्ट लिहून तिने हा फोटो शेअर केला आहे. 



या फोटोचं डिझाइन आणि इल्यूस्ट्रेशन उदय मोहितेने केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तेजस्विनीला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या काळात सतत कार्यरत असलेली तिसरी व्यक्ती म्हणजे सफाई कर्मचारी. यांना लॉकडाऊनमध्ये सुट्टीही नव्हती आणि वर्क फ्रॉम होम हा पर्याय ही नव्हता. त्यामुळे यांची तेजस्विनीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.