Jaya Bachchan in Navya Nanda Podcast  : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचं वॉट द हेल नव्या हा पॉडकास्ट (What The Hell Podcst) दर आठवड्याला प्रदर्शित होतो. या एपिसोडमध्ये नव्या तिची आई श्वेता आणि आजी जया बच्चन यांच्यासोबत दिसते. त्या तिघी बसून अनेक गोष्टींवर चर्चा करताना दिसतात. त्यात त्या तिघांचे त्यांच्या वयानुसार असणारे अनुभव आणि त्यासोबत त्यांची कोणत्याही गोष्टीविषयी असलेली विविध मत ऐकायला मिळतात. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या एपिसोडचा प्रोमो नव्यानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात नव्या आणि जया बच्चन एका टीममध्ये असून श्वेताला तिच्या चुका दाखवत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत नव्यानं कॅप्शन दिलं की वय आणि अनुभव? या तीन जनरेशन नव्या, आजी आणि आई यांच्यात हे फार मजेशीर होणार आहे. व्हिडीओमध्ये नव्या तिच्या आई आणि आजीला विचारते की जास्त चुका केल्यानं अनुभव येण्यास मदत होते? त्याचं उत्तर देत श्वेता बोलते की "मला वाटतं की सगळ्यात चांगली गोष्ट जी तुम्ही तुमच्या मुलांसाठी करु शकता, ती ही आहे की मुलांना स्वत: चुका करु द्या." तर जया बच्चन म्हणाल्या, "जेव्हा तुम्ही कोणत्या कठीण गोष्टींवर मात करता तेव्हा तुम्हाला त्यातून मिळालेला अनुभव पुढे कामी येतो." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


श्वेता पुढे बोलते की "मला वाटतं की तरुण लोक खऱ्या आयुष्यात बदलू शकतात आणि बोलू शकतात, ही ती गोष्ट आहे जिथे तुम्ही चुकी करताना आणि तुम्हाला तुमची ती चूक आवडत नाही. नव्यानं बघा ती श्वास न घेता बोलत राहते. त्यामुळे त्यात कोणतेही मॉड्यूलेशन, पूर्णविराम आणि कॉमा नसतो." नव्या तिच्या आईला बोलते की "जेव्हा तू बोलतेस तेव्हा तुझा स्वभाव हा हुकुमशाही सारखा असतो." जेव्हा श्वेता याचा विरोध करते तेव्हा जया बच्चन बोलतात की "श्वेता तू करतेस. माझं ऐक."


हेही वाचा : उर्मिलावर केलेल्या 'सॉफ्ट पॉर्न' कमेंटवर कंगना रणौतनं सोडलं मौन, म्हणाली 'तिनं तिकीट मिळवण्यासाठी...'


नव्याच्या शोविषयी बोलायचे झाले तर गेल्या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी चर्चा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की कशा प्रकारे त्यांनी अमिताभ यांचा कठीण काळ सुरु असताना त्यांना साथ दिली होती.