मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे असभ्य वर्तन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पापाराझींसोबत त्यांचे वागणे कोणालाच आवडत नाही. याच कारणामुळे त्या सोशल मीडियावरही टार्गेट झाल्या असल्या तरी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी नात नव्या नवेली नंदाविषयी (Navya Naveli Nanda)  एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की नव्या विवाहाशिवाय मूल झालं तर त्यांची काही हरकत नाही. त्यावर आता नव्यानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


नव्याने काय दिली प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यावर तिची प्रतिक्रिया देत म्हणाली की, 'आमच्यात झालेलं ते संभाषण विसरण्यासारखं नाही.' पुढे तिच्या पॉडकास्ट विषयी सांगताना म्हणाली, 'तिच्या पॉडकास्टमागील संपूर्ण कल्पना महिलांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणे हा होता आणि त्यात काही चूक नाही. एनडीटीव्हीशी बोलताना ती म्हणाली की 'नातेसंबंध आणि मैत्री या विषयांवर चर्चा करताना मला आत्मविश्वास वाटतो. नव्या हे देखील म्हणाली की तिच्या एका पॉडकास्ट एपिसोडमध्ये ती महिलांचे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल बोलते. या विषयांवर चर्चा करण्यासाठी सुरक्षित, निरोगी आणि आरामदायी वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे आणि तिने तिच्या पॉडकास्टमध्ये असेच केल्याचे तिनं कबूल केले.'


नव्याने पुढे म्हणाली की, 'एखाद्यानं हे समजून घेणं आवश्यक आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलत असताना प्रत्येकजण तुम्हाला पाहत आहे, त्यावेळी काही लोक सहमत असतील आणि काही लोक असहमत असतील. तिला याची जाणीव आणि विश्वास आहे की ती तिच्या पॉडकास्टसह मजेदार आणि बुद्धिमान संभाषणं करत आहे. एपिसोडला मिळत असलेलं प्रेम आणि समर्थनासाठी ती सगळ्यांचे आभार मानते. ' (Navya Naveli Nanda Reply To Jaya Bachchan Statement It Was About Safe Environment For Women What S Wrong Read The Details) 


काय म्हणाल्या होत्या जया बच्चन


तरुण पिढीला आणि नात नव्याला सल्ला देत जया म्हणाल्या, 'मला वाटतं तू तुझ्या जिवलग मित्राशी लग्न कर. तुझ्या जवळ एक चांगला मित्र असला पाहिजे. तुम्ही चर्चा करायला हवं, कदाचित मला तुझ्यासोबत मूल हवं आहे, कारण मला तू आवडतोस. मला वाटतं की तू चांगला आहेस. तर लग्न करूया, कारण समाज असंच म्हणतो. लग्न न करताही तुला मूल झालं तरी माझी काही हरकत नाही. मला खरोखर काही अडचण नाही.'