Amitabh Bachchan Granddaughter : अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नवेली नंदा ही वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे अनेक फॅन्स आहेत. इन्टाग्रामवरही ती अनेकदा सक्रिय असते. ती सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे पॉडकास्टही पोस्ट करत असते. मध्यंतरी तिनं आपल्या आजीसह आणि आईसह एक पॉडकास्ट केला होता. ज्याची बरीच चर्चाही रंगली होती. काही दिवसांपुर्वी ती शेतात चक्क ट्रॅक्टर चालवताना दिसली होती तेव्हाही तिची खूप चर्चा होती. आता अमिताभ बच्चन यांच्या नातीनं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. यावेळी तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ती अस्खलित हिंदी भाषेत बोलते आहे आणि हे पाहून उपस्थितांनाही आश्चर्य आणि आनंद वाटला आहे. यावेळी तिचं एक भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते असले तरीसुद्धा त्यांच्या घरात लहानपणापासून त्यांच्यावर हिंदी भाषेचे संस्कार झालेच आहेत. त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन हे लोकप्रिय हिंदी कवी होते. त्यांच्या कविता या आजही फारच गाजतात. त्यांच्या कविता या अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे बच्चन घराण्यात झालेले हे हिंदीचे संस्कार येणाऱ्या नव्या पिढीवरही होतील यात काहीच शंका नाही. नव्या नवेली नंदाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक युथ टॉक शोमध्ये ती चक्क शुद्ध हिंदी भाषेत बोलताना दिसते आहेत. ना इंग्रजी ना इतर कुठल्याही भाषेचा वापर तिनं यावेळी केला आहे. त्यामुळे तिच्या या हिंदीतल्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 


यावेळी तिनं बदल घडवून आणण्यासाठी तरूणांची भुमिका किती महत्त्वाची असते. यावर आपले विचार मांडले आहेत. हे सांगताना तिनं आपलं हे संपुर्ण भाषण अस्खलित, स्पष्ट आणि शुद्ध भाषेत केलं आहे. हिंदी भाषेवरील तिचे हे प्रभुत्व पाहून उपस्थितांना कोण आनंद झाला आहे आणि तिनं यावेळी नेटकऱ्यांची मनंही जिंकून घेतली आहेत. 


हेही वाचा - न्यासा देवगण नव्हे, कोणा भलत्याच अभिनेत्रीसोबत फिरतोय ऑरी; Private Photos व्हायरल


या व्हिडीओत तिनं आपले विचार मांडले आहेत. ती म्हणाली की, ''मी अनेकवेळा ऐकते की, तुला अनुभव नाही, तू तरुण आहेस. तू लहान आहेस, तू 25 वर्षांची आहेस, तूला असा जीवनाचा अनुभव काय आहे? आरोग्यसेवा, कायदेशीर जागरूकता, घरगुती हिंसाचार या विषयांवर तू कसं काय काम करू शकतेस? मी विचार करते की जर मी 80 वर्षे या गोष्टींची वाट पाहिली तर या जगाचे काय होईल?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आपल्या देशातील अनेक टक्के लोक 20 ते 30 वयोगटातील आहेत. सर्व काही करण्यासाठी 50 वर्षे वाट पाहिली तर या पिढीचे काय होईल? आपल्या देशात बदल कोण आणणार? या पिढीला लहान वयात भरपूर ज्ञान आहे, आम्हाला कमी लेखू नये, आपण सक्षम आहोत'', असं ती यावेळी निक्षुन म्हणाली.