मुंबई : प्रेम एक अशी गोष्ट आहे ज्याने संपूर्ण जग देखील जिंकता येत. असंच काहीस घडलयं बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत. त्याच्या अभिनयाची जादू तर सर्वदूर पसरली आहे. अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. आता तो अष्टपैलू अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. 'सेक्रेड गेम्स २' मधील त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच तो एका अनोख्या अंदाजात चाहत्यांच्या समोर आहे. 'बोले चुडियां' चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत रोमान्स करताना झळकणार आहे. हा चित्रपट चर्चेत असल्याचेमुळ कारण म्हणजे, यात कोणत्याही प्रकारचा राग, बदल्याची भावना, अॅक्शन नाही, तर फक्त दोन प्रेमींचा भाव रेखाटण्यात येणार आहे. 


खुद्द नवाजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते रोमान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओ नवाज-तमन्ना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.