Nawazuddin Siddiqui On Wife Aaliya : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहेत. आलियानं नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ती सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन तिच्यासोबत कशी वागणूक करत आहे ते सांगताना दिसते. इतकंच काय तर नवाजुद्दीनचा भाऊ स्वत: त्याच्या विरोधात आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या या वादावर नवाज गप्प होता. मात्र, अखेर नवाजुद्दीननं यावर मौन सोडलं आहे. नवाजुद्दीननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाजुद्दीननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नवाजुद्दीन म्हणाला, "मी बोलत नाही म्हणून मी वाईट व्यक्ती आहे असे म्हटले जाते. मी यावर इतके दिवस यामुळे गप्प होतो कारण हे सगळं प्रकरण माझी लहान-लहान मुलं वााचतील. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि पोस्टमुळे फक्त एकबाजू आणि चूकिच्या गोष्टींवर माझ्या विषयी गोष्टी सांगितल्या जात आहेत. तो पुढे म्हणाला की त्याला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो आणि आलिया गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्याचा आणि आलियाचा कधीच घटस्फोट झाला आहे पण फक्त तो त्याच्या मुलांसाठी हे सगळं समजून घेतोय."


हेही वाचा : Amitabh Bahchan यांचा आधीही झाला होता भीषण अपघात; बिग बींच्या पुर्नजन्माची कहाणी माहितीये का तुम्हाला?


नवाजुद्दीन पुढे म्हणाला, "तुम्हाला माहितीये का की माझी मुलं भारतात का आली आहेत आणि 45 दिवस शाळेत जाऊ शकले नाही, ज्यामुळे त्यांच्या शाळेतून मला रोज लेटर पाठवत आहेत की खूप मोठी सुट्टी आहे. माझ्या मुलांना गेल्या 45 दिवसांपासून कैद करून ठेवलं आहे आणि दुबईत असलेल्या त्यांच्या शाळेत अनुपस्थिती होत आहे. याशिवाय नवाजुद्दीन म्हणाला की आलियानं 4 महिन्यांपूर्वी त्याच्या मुलांना दुबईत सोडले होते. पैसै मागण्याच्या बहाणे आलियानं शोरा आणि यानीला मुंबईत बोलावण्या आधी दुबईत सोडले होते. त्यानं दावा केला की मुलांसोबत दुबईत जाण्याआधी आलियाला शाळेची फी, डॉक्टरसाठी लागणारे पैसे, प्रवासासाठी लागणारे पैसे आणि इतर सुट्ट्यासोडल्या तर तिला जवळपास 10 लाख रुपये आणि दरमहिन्याला 5 ते 7 लाख रुपये पोटगी दिली जात आहे."



नवाजुद्दीन म्हणाला,"'मी तिच्या 3 चित्रपटांसाठी पैसे देखील दिले होते, ज्याची रक्कम कोटींच्या घरात आहे. फक्त ती माझ्या मुलांची आई आहे म्हणून तिला तिच्या उत्पन्नाचा स्रोत मिळावा म्हणून मदत करण्यासाठी मी ते केलं. माझ्या मुलांसाठी मी तिला अप्रतिम गाड्या दिल्या होत्या, पण तिनं त्या विकल्या आणि पैसे खर्च केले. मी माझ्या मुलांसाठी वर्सोवा, मुंबई येथे एक भव्य अपार्टमेंट देखील विकत घेतले आहे. माझी मुले अल्पवयीन असल्याने आलियाला त्या अपार्टमेंटची सह-मालक बनवण्यात आले आहे. मी माझ्या मुलांना दुबईत भाड्याचे अपार्टमेंट दिले आहे, जिथे ती देखील आरामात राहत होती."


पुढे नवाजुद्दीनं दावा केला की "आलियाला फक्त आणि फक्त पैसे पाहिजे, त्यामुळेच तिच्या आणि तिच्या आई विरोधात तक्रार दाखल केली होती. नवाजुद्दीनं म्हणाला की आलियानं या आधीही असं केलं आहे. माझी मुलं जेव्हा पण भारतात येतात तेव्हा ते माझ्या आईसोबत राहतात. त्यांना कसं कोण घरातून काढू शकतं. त्या दरम्यान, मी स्वत: घरात नव्हतो. तिनं हे सांगितलं का नाही. घरातून बाहेर काढतानाचा व्हिडीओ तिनं का केला नाही. नाही तर ती तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचे व्हिडीओ करत असते. आज मी जे काही करतो ते माझ्या दोन्ही मुलांसाठी करतो आणि कोणीही त्याला बदलू शकत नाही. माझे शोरा आणि यानीवर खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्या चांगल्याचा विचार करतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी काहीही करू शकतो. आजपर्यंत मी सगळ्या केस जिंकल्या आहेत आणि माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हे सगळं सांगत मी आरोप करत नसून माझ्या भावना व्यक्त करत आहे."