Sacred Games kubra sait : 'सेक्रेड गेम्स' या गाजलेल्या वेब सीरीजमुळे प्रचंड चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे कुबरा सैत ही सीरिजमधील तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत होती. या सीरिजमध्ये तिने साकारलेल्या ट्रान्सजेण्डरच्या भूमिकेची चांगली वाहवा झाली होती. विशेष म्हणजे तिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिलेल्या इंटिमेट सिन हा चर्चेचा विषय बनला होता. मात्र, हा सिन कसा शूट झाला? हा सीन शूट करण्यात आला तेव्हा कुबरा सोबत नेमकं काय घडलं होतं? याविषयी कुबरानं एक किस्सा सांगितला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुबराचा हा सीन तुम्हाला लक्षात आलाच असेल कोणत्या वेब सीरिजमधला आहे. ती म्हणजे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय सीरिज 'सेक्रेड गेम्स' आहे. या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत कुबरा दिसली होती. या सीरिजनंतर कुबराला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिला लाखो लोक ओळखू लागले. 



या, दरम्यान एका मुलाखतीत कुबरा सैतला तिच्या गाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या इंटिमेट सिनबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी अभिनेत्रीने मोकळेपणाने हा किस्सा शेयर केला होता. कुबरा सैतने या सिनबद्दल बोलताना सांगितले की, नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत केलेल्या इंटिमेट सीन करताना तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला याविषयी तिने सांगितले होते. 


हेही वाचा : Shilpa Shetty इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच तिच्या मुंबईतील घरात काय घडलं पाहिलं का?


कुबरा सैत याविषयी म्हणाली की, नवाजुद्दीन सिद्दीकी ही खऱ्या आयुष्यात खूप लाजाळू व्यक्ती आहे. त्याला या इंटिमेट सीनसाठी मेंटली तयार करणं सर्वात अवघड काम होतं. त्यामुळे ते सीन्स करताना या दोघानाही अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या एकाच  सीन दरम्यान त्यांना एक-दोन नव्हे तर चक्क 7 टेक द्यायचे होते. त्यांनी तो सीन करण्यात संपूर्ण दिवस घालवला आणि अनेक तास सीन केल्यामुळे कुबरा सैतची तब्येत बिघडली होती. त्यामुळे सेटवरच ती जोरजोरात रडू लागली होती. मात्र, हे सर्व पाहून नवाज आणि अनुराग कश्यप यांनी कुबराला सांभाळून घेतले.