मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मोठा धमाका केला आहे. नवाजुद्दीनने एका परदेसी मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ही मुलगी माझ्या रोमारोमात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाजुद्दीनच्या या पोस्टने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. वेब सिरीज सेक्रेड गेम्स ला नवाजुद्दीनने आपल्या अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता सध्या या वेब सिरीजचे शूटिंग अज्ञात जागी सुरु आहे. पण नवाजुद्दीनची ही पोस्ट पाहून तो युरोपमध्ये असल्याचे वाटते.



कान फिल्म फेस्टिवलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर मंटो या सिनेमाने अनेकांचे लक्ष वेधले. पण भारतात या सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मंटो हा सिनेमा भारतीय सेंसर बोर्डात अडकू शकतो. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 


या सिनेमासाठी सेंसर बोर्डाला सामोरे जावे लागेल, याची कल्पना सिनेमच्या दिग्दर्शिका नंदीता दास यांनाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून वादात अडकला आहे. यावरुन अनेक साहित्यिक आणि निर्मात्यांनी सरकारी पुरस्कारही परत केले.