मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक उत्कृष्ट कलाकार आहे. शाहरुख खान आणि सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी यांने एका मुलाखतीत दोन सुपरस्टार्सच्या वर्किंग स्टाईलमधील फरकाबद्दल सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने शाहरुख खानविषयी सांगितलं होतं की, तो सीन जो पर्यंत पफेक्ट होत नाही होईपर्यंत तो सीन करत राहील. कारण शाहरुख खान थिएटर आर्टिस्ट आहे. तो खर्‍या अभिनेत्याबरोबर काम करत असल्याचं त्याला वाटते. तर सलमान खानसोबत कामाविषयी नवाजुद्दीन सिद्दीने सांगितलं की, तो कोणताही टेक न घेता एखादा सीन एकदाच शूट करतो. . 


नवाजुद्दीन सिद्दीकीने सलमान खानबरोबर 'बजरंगी भाईजान' आणि 'किक' या दोन चित्रपटात काम केलं आहे. त्याचबरोबर त्याने शाहरुख खानसोबत 'रईस' या चित्रपटात काम केलं आहे. या सर्व चित्रपटांत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कामाचं कौतुक केलं गेलं आहे.


वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, शाहरुख खान दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान खान एक कॅमिओ रोल करताना दिसणार आहे. त्याचबरोबर सलमान खान 'टायगर 3' चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. याशिवाय पूजा हेगडेसोबत 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात आणि जॅकलिन फर्नांडिजसमवेत 'किक 2' या चित्रपटात तो दिसणार आहे.